
नेवासा – छत्रपती शिवाजी महाराज यांची टिपू सुलतानशी तुलना करून केलेल्या अवमानाविरोधात निषेधार्थ काँग्रेसचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या पुतळ्याचे शहरातील खोलेश्वर चौक येथे दहन करून सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,छत्रपती शिवाजी महाराजांनी इस्लामी आक्रमनाचा समर्थपणे प्रतिकार करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी हिंदूंचे स्वराज्य उभे केले, न्यायाचे राज्य प्रस्थापित केले आणि प्रशासनात कधीही धर्म, जात किंवा पंथाच्या आधारे दुजाभाव केला नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व नसून, ते महाराष्ट्राच्या व संपूर्ण भारताच्या सांस्कृतिक अस्मितेचे, स्वाभिमानाचे आणि न्यायप्रिय राज्यकारभाराचे प्रतीक आहेत. अशा महान राष्ट्रपुरुषांची तुलना काँग्रेस पक्षाचे जबाबदार पदाधिकारी व काँग्रेसचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान याच्याशी करून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला आहे.

टिपू सुलतान याने स्वतःचे इस्लामी साम्राज्य वाढवण्यासाठी असंख्य हिंदूंची कत्तल केली व देशात मुसलमानी दहशत निर्माण केली, अशी ऐतिहासिक नोंद आहे. अशा व्यक्तीशी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करणे हे इतिहासाचे विकृतीकरण असून, भारतीय समाजाच्या सांस्कृतिक भावनांवर थेट आघात करणारे आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, लोककल्याणकारी प्रशासनाचे आदर्श आणि भारतीय संस्कृतीतील न्याय, शौर्य व स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. त्यांच्या तुलनेत टिपू सुलतानसारख्या वादग्रस्त व अत्याचारी राज्यकर्त्याचे उदात्तीकरण करणे हे केवळ वैचारिक चूक नाही, तर भारतीय संस्कृतीचा, इतिहासाचा आणि समाजमानसाचा अपमान आहे. अशा तुलनेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचे अवमूल्यन होते आणि खोटा इतिहास रुजवण्याचा प्रयत्न होतो.

आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान याचे जाणीवपूर्वक उदात्तीकरण करून मानवी हक्कांची पायमल्ली केली आहे. आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना हिंदवी स्वराज्य नको आहे का ? त्यांना देशामध्ये टिपू सुलतान म्हणजे इस्लामी राज्य हवे आहे का? असे गंभीर प्रश्न त्यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झाले आहेत. आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या या जाणीवपूर्वक विधानाला कुठलाही भारतीय नागरिक कधीही सहन करणार नाही, तसेच अशा प्रकारची उदात्तीकरणाची प्रवृत्तीही सहन केली जाणार नाही. हिंदूंच्या कत्तलीचे समर्थन कुठलाही भारतीय नागरिक करणार नाही. खोटा इतिहास तयार करून भारतीय अस्मिता आणि भारतीय नागरिकांवर झालेला अन्याय पुसण्याचा हा प्रयत्न आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी जाणीवपूर्वक केला आहे.

देशातील महापुरुषांची तुलना टिपू सुलतानसारख्या ‘हिंदूंची कत्तल’ करणाऱ्या राज्यकर्त्यांशी करणे हा राष्ट्राचा व संस्कृतीचा घोर अपमान आहे. हा अपमान आम्ही भारतीय नागरिक व जागरूक समाज म्हणून कधीही सहन करू शकणार नाही. त्यामुळे काँग्रेसचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या व्यक्तव्याचा निषेध आम्ही समाजाचा व देशाचा एक जागरूक घटक म्हणून केला आहे निषेधाचे स्वरूप म्हणून आम्ही आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या पुतळ्याचे दहन श्री खोलेश्वर गणपती चोक, नेवासा येथे केले आहे भारतीय संविधानाने आम्हाला नागरिक म्हणून दिलेल्या निषेधाच्या अधिकाराचा आम्ही सनदशीर मार्गाने वापर करून सदरील निषेध व्यक्त केला आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

