सोनई – राज्यशासनाच्या कर्जमाफी धोरणाच्या प्रश्वभूमीवर शासन पातळीवर साखर कारखानाच्या कामगार, पदाधिकारी यांची माहिती मागवली असून त्यांचा पूर्ण अभ्यास करून कर्जमाफीचा लाभ मिळावा, त्यांना शासनाने वगळू नये, जर याविरुध्द निर्णय घेतल्यास आंदोलनाचा वेगळा विचार केला जाईल असा इशारा साखर कामगार राज्य संघटनेने दिला आहे.

नुकतीच पुणे येथे साखर आयुक्त कार्यालयामध्ये महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे शिष्ट मंडळ बैठक घेण्यात आली, त्यावेळी विविध कामगार समस्या बाबत आढावा घेऊन चर्चा करण्यात आली.यावेळी राज्य अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सरचिटणीस राऊ शंकर पाटील, उपाध्यक्ष डी.एम.निमसे, युवराज रणवरे, प्रदीप शिंदे, कार्याध्यक्ष राजेंद्र चव्हाण, कोषाध्यक्ष प्रदीप बनगे,सचिव राजेंद्र तावरे, संजय मोरबाळे, संजय पाटील, योगेश हंबीर, तसेच मुळा कारखाना राष्ट्रीय साखर कामगार युनियनचे अध्यक्ष अशोकराव पवार यावेळी उपस्थित होते.
यावेळी शिष्टमंडळाने साखर आयुक्त यांना कामगारांचे प्रश्न संदर्भात निवेदन देण्यात आले. त्यामध्ये त्रिपक्षीय समितीच्या निर्णयाप्रमाणे कामगारांना वेतन दिले जात नाही व कामगार कायद्याची अंमलबजावणी होत नाही

महाराष्ट्रा मध्ये साखर उद्योगात सहकारी खाजगी व भाडेतत्त्वावर साखर कारखाने चालतात या सर्व साखर कारखान्यामध्ये कामगारांना कामगार कायद्याप्रमाणे कोणत्याही सोयी सुविधा दिल्या जात नाही, वरील प्रमाणे बऱ्याच साखर कारखान्यामध्ये त्रिपक्षीय समितीच्या झालेल्या निर्णयाप्रमाणे आजपर्यंत दहा टक्के वेतन वाढ ची अंमलबजावणी केलेली नाही, दहा टक्के वेतन वाढ,आजपर्यंत लागू करण्यात आली नाही अशा संबंधित साखर कारखान्याची आपण पुणे येथे एकत्रित बैठक लावून निर्णय घेण्यात यावा. शासनामार्फत शेतकऱ्याची जी कर्जमाफी होणार आहे त्यामध्ये साखर कामगार व इतर सहकारी संस्थेतील संचालक, अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी,यांची माहिती मागितली जात आहे. शासन पातळीवरून माहितयामध्ये ७०ते८० टक्के साखर कामगार हा हंगामी कामगार आहे, त्यामुळे हा कामगार तीन ते चार महिनेच कामावर असतो इतर दिवशी कारखाना चालू होईपर्यंत घरी असतो त्यामुळे आपण साखर कामगारास कामगार सज्ञेतून वगळून त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा, तसें निवेदन महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ यांच्या वतीने देण्यात आले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

