आरोपी

नेवासा-शिंगणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १७ वर्षीय अल्पदयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून, पळवून नेल्याप्रकरणी शिंगणापूर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेऊन आरोपीस ताब्यात घेतले आहे.

अल्पवयीन मुलगी ही दि. १४ फेब्रुवारी रोजी टेलरकडे जाते, असे सांगून घराबाहेर पडली होती. सायंकाळपर्यंत ती घरी न आल्याने नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला. त्यानंतर शिंगणापूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य ओळखून शिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेतला असता, पिंपळगाव (ता. राहाता) येथे सदर मुलगी व हरिभाऊ गंगाधर पवार (वय४०) हे मिळून आले.

Kavya

अपहरण झालेल्या मुलीच्या माहितीनुसार, आरोपी हरिभाऊ पवार याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवले व तिला पळवून नेले. तसेच, तिच्या आई-वडिलांशी संपर्क होऊ नये म्हणून तिचा मोबाईल फोनही ताब्यात ठेवला होता, असे समजते.

आरोपीविरुद्ध बीएनएस सन २०२३ चे कलम व पोक्सो सन २०१२ च्या कलमान्वये कलम वाढ करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बी. एन. कारखेले हे करत आहेत. मुलींच्या सुरक्षिततेबाबत पोलीस प्रशासन अत्यंत सतर्क असून, पालकांनी आपल्या पाल्यांच्या हालचालींकडे लक्ष द्यावे, आणि काही संशयास्पद आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन शिंगणापूरचे सहायक पो. नि. आशिष शेळके यांनी केले आहे.

आरोपी
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आरोपी
आरोपी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आरोपी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!