
नेवासा – महाराष्ट्रातील आद्य पत्रकार, ‘दर्पणकार’ म्हणून ओळखले जाणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त नगरपंचायत नेवासा येथे अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. नेवासा प्रेस क्लबच्या पत्रकार यावेळी उपस्थिती होते. योगायोगाने आजच जागतिक सामाजिक न्याय दिन असल्याने कार्यक्रमाला अधिक व्यापक सामाजिक आशय लाभला.
प्रेस क्लब चे अध्यक्ष गुरुप्रसाद देशपांडे यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी नगरसेवक महेश लोखंडे संदीप सरकाळे अनिल पवार युवा नेते कृष्ण परदेशी नगरपंचायतीचे प्रभारी कार्यकारी अधिकारी सागर झावरे हे मान्यवर उपस्थित होते.

नगरसेवक प्रवीण आप्पा सरोदे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. व प्रास्ताविकात त्यांनी पत्रकारांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करत, समाजहितासाठी पत्रकारिता न्यायनिष्ठ आणि मूल्याधिष्ठित असणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार अशोक डहाळे यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनप्रवासावर व कार्यकर्तृत्वावर सखोल प्रकाश टाकत त्यांच्या पत्रकारितेतील धैर्य, प्रबोधनाची तळमळ आणि सामाजिक बांधिलकी यांचे स्मरण केले.

जागतिक सामाजिक न्याय दिनाच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत नेवासा यांच्या कार्यपद्धतीविषयी नगराध्यक्ष करण सिंह घुले यांनी भूमिका स्पष्ट केली. समाजातील आर्थिकदृष्ट्या तळागाळातील, सर्व जाती-धर्म-पंथांतील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्य करणे हेच प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार हे समाजाचा आरसा असून त्यांचा सन्मान करणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे, असा सूर त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला. पुढे ‘पत्रकार दिन’ नगरपंचायतीच्या वतीने नियमित साजरा करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

यावेळी पत्रकार गुरुप्रसाद देशपांडे, अशोक डहाळे, राजेंद्र वाघमारे, लक्ष्मण नाबदे, रमेश शिंदे यांच्यासह अमोल सोनवणे राजेंद्र चव्हाण नवनाथ मतकर प्रताप कडपे सुधीर चक्रनारायण सतीश सरोदे राजेश्वर सोनवणे सुनील गांगुर्डे अनुलोमचे अविनाश गायकवाड सुनील गोसावी, संतोष ढोल, अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

