शिष्यवृत्ती

नेवासा-जिल्ह्यात इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा रविवार (दि.२२) शांततापूर्ण वातावरणात पार पडली. या परीक्षेला पाचवीचे ३७ हजार ९५१ तर आठवीचे २० हजार ६४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील पाचवीच्या पहिल्या पेपरला ६५८, दुसऱ्या पेपरला ६६२ तर आठवीच्या पहिल्या पेपरला ४२६ आणि दुसऱ्या पेपरला ४३० असे २ हजार १७६ विद्यार्थ्यांनी दांडी मारली.

गैरहजर असणाऱ्यामधील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा परीक्षा शुल्क जिल्हापरिषद प्रशासनाने भरलेला आहे. यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील गैरहजर विद्यार्थ्यांबाबत काय निर्णय होणार याकडे जिल्हा परिषदेचे लक्ष राहणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार यापुढे इयत्ता चौथी व सातवीतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाणार आहे. या ‘परीक्षेला अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयं अर्थसहाय्यिता शाळांमधील विद्यार्थी बसू शकतात. या परीक्षेत विद्यार्थ्यांना दोन पेपर द्यावे लागणार आहेत.

शिष्यवृत्ती

प्रत्येक पेपर १५० गुणांचा राहणार आहे. परीक्षेत वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी प्रश्न असून विद्यार्थ्यांना बहुपर्यायातून एक अचूक पर्याय निवडावा लागतो. दरम्यान, पूर्वीपासून इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांचीच शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जात होती. पण, काही काही वर्षांपूर्वी पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय झाला. आता तो पुन्हा बदलण्यात आला असून यापुढे इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांचीच परीक्षा होणार आहे. यामुळे रविवारी झालेली पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षाही शेवटची परीक्षा होती. दुसरीकडे इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिल रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील सर्व शाळांमधील सुमारे ५० हजार विद्यार्थी आहेत. परीक्षेच्या निकालानंतर मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना.. दरवर्षी पाच हजार आणि साडेसात हजार रुपये शिष्यवृत्ती शासनाकडून दिली जाते. पुढील तीन वर्षे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सुरू राहत असते.

शिष्यवृत्ती

दरम्यान, रविवारी झालेल्या परीक्षेला पाचवीच्या पेपर क्रमांक एकला ३८ हजार ६०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. यातील ३७ हजार ९५१ विद्यार्थी हजर होते तर ६५८ विद्यार्थ्यांनी दांडी मारली. पेपर क्रमांक दोनला ३८ हजार ६०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील ३७ हजार ९४७ विद्यार्थी हजर होते. तर ६६२ विद्यार्थी गैरहजर होते. आठवीच्या पेपर क्रमांक १ ला २१ हजार ६६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर २० हजार ६४० विद्यार्थी हजार होते. परीक्षेला ४२६ विद्यार्थ्यांनी तर पेपर क्रमांक दोनला २१ हजार ६६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात २० हजार ६३६ विद्यार्थी हजर होते. ४३० विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली.

शिष्यवृत्ती
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शिष्यवृत्ती
शिष्यवृत्ती

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शिष्यवृत्ती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!