शिंगणापूर

नेवासा– नागपुर येथील रोशन अर्जुन मोरया यांनी दुकानदाराने लुटल्याची फिर्याद ११२ नंबरवर कॉल करुन दिल्यानंतर शनिशिंगणापूर पोलिसांनी अवघ्या तीन मिनिटाच्या आत कॉलरला भेटून कारवाई केली.

रोशन अर्जुन मोरया हे मित्रासह शिर्डी येथून शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी खाजगी ट्रॅव्हल्सने आले होते. ग्रामपंचायत टोलनाक्यावरुन एक इसम बसमध्ये बसला. त्याने त्याचे नाव किरण जाधव असे सांगून शनिशिंगणापूर येथील शनिरंजन नारळ विक्री दुकान नंबर ३३ वर बस थांबवली. तेथे दुकानदाराने पुजेच्या ताटाची किंमत अठराशे रुपये सांगितली.

Kavya

जास्त किमतीबाबत विचारणा केली असता दुकानदाराने फिर्यादिशी हुज्जत घालून शिवीगाळ केली व रोख पैसे दे नाहीतर येथून तू नीट जाणार नाही अशी धमकी दिल्याने फिर्यादीने घाबरून १८०० रुपये रोख रक्कम दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके, पोलीस कॉन्स्टेबल रवीकांत गरजे, पोलीस कॉन्स्टेबल मृत्युंजय मोरे, चालक पोलीस कॉन्स्टेबल संतोष मुरकुटे हे तीन मिनिटाच्या आतमध्ये पोहोचले असता मोरया यांनी शिर्डी येथून पुढील बस बुकिंग असल्याचे सांगितल्याने त्यांनी कथन केलेली तक्रार पोलीस कॉन्स्टेबल मृत्युंजय मोरे यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये ई-साक्ष प्रणालीचा वापर करून व्हिडिओ चित्रीकरण केले व पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली.

शिंगणापूर
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शिंगणापूर
शिंगणापूर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शिंगणापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!