नेवासा – शिवजयंतीचे औचित्य साधून नेवासा तालुक्यातील सलाबतपूर गावचे सरपंच अझर शेख यांनी स्वखर्चाने स्वागत कमान (छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार) उभारण्याचा संकल्प केला असून मच्छिंद्र महाराज निकम यांच्याहस्ते नुकतेच भूमिपूजन करण्यांत आले.
सलाबतपूर बसस्थानक परिसरात ही कमान उभारली जाणार असून यामुळे गावाच्या वैभवात भर पडणार आहे. या कमानीसाठी लागणारा संपूर्ण खर्च सरपंच अझर शेख करणार आहे.

गावाला अद्याप सौवामर कमान नव्हती. त्यामुळे अझर शेख यांच्या संकल्पनेचे गावातून स्वागत होत आहे. कमानीला शिवस्मारकाची
जोड असल्याने तरूण पिढीला इतिहासाची जाणीव रहावी हा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सरपंच शेख यांनी सांगितले. यावेळी शिव जन्मोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार उभारण्याचा मानस असल्याने शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सव्वातीन लाख खर्चाचे हे काम केवळ दोन महिन्यात पूर्ण करून लोकार्पण होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार म्हणून सलाबपूर गावची नवीन
ओळख निर्माण होणार आहे.

यावेळी छत्रपती शिवाजी महारांजाना शिवप्रेमींकडून अभिवादन करण्यांत आले. कार्यक्रमाप्रसंगी नवनाथ शिंदे, अंबादास गोरे, सुनिल नजन, बाळासाहेब निकम, बबनराव तांबे, अश्पाक शेख, गणेश देशमुख, अदिनाथ निकम, संभाजी नवले, हरिश्चंद्र तांबे, सागर शिंदे, बाळासाहेब जाधव, गणेश दळवी, बबलू चावरे, वैजिनाथ निकम, अक्षय जाधव, आदी शिवप्रेमी उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

