रवींद्र चव्हाण यांच्या नव्या कार्यकारिणीत विखे पाटलांकडे महत्त्वाची जबाबदारी
नेवासा- राज्यातील आगामी राजकीय समीकरणे आणि पक्ष संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने मोठी घोषणा केली असून, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केलेल्या नव्या कार्यकारिणीत नगर जिल्ह्याला मोठे प्रतिनिधित्व मिळाले असून, डॉ. विखे पाटील यांच्या रूपाने थेट राज्य संघटनेच्या उच्च पदावर जिल्ह्याची वर्णी लागल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.

विखे पाटील यांच्यासह गोपीचंद नव्या कार्यकारिणीत डॉ. सुजय पडळकर, डॉ. भारती पवार, रामदास तडस आणि केशव उपाध्याय अशा १० नेत्यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ‘ तसेच सरचिटणीसपदी निरंजन डावखरे, संजय कुटे आणि माधवी नाईक यांसारख्या अनुभवी नेत्यांना स्थान देण्यात आले आहे.आहे. मुख्य प्रवक्ते म्हणून नवनाथ बन, युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी कृष्णराज महाडिक तर महिला मोर्चाच्या धुरा पुन्हा चित्रा वाघ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

मुंबईतून जाहीर झालेल्या या नव्या यादीत विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये डॉ. सुजय विखे पाटील यांनी केलेल्या संघटनात्मक कामाची आणि पक्ष विस्तारातील मेहनतीची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे. २०२९ च्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने ही नवी फळी मैदानात उतरवली असून, डॉ. विखे पाटील यांच्यावर टाकलेली ही जबाबदारी जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात महत्त्वाची मानली जात


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

