मुळा एज्युकेशन सोसायटी

माका-कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, माका येथे क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२५–२०२६ अंतर्गत वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मंगळवार, दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष मा.उदयनदादा गडाख पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सोनई येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल मोरे उपस्थित होते.

मुळा एज्युकेशन सोसायटी

प्राचार्य भानुदास चोपडे यांनी प्रास्ताविकात शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक वाटचालीचा आढावा घेत महाविद्यालयाच्या प्रगतीची माहिती दिली.

प्रमुख पाहुणे अनिल मोरे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा आदर राखून शिक्षणाच्या माध्यमातून आदर्श नागरिक बनावे, असे आवाहन केले. कष्ट, प्रामाणिकपणा व शिस्त या गुणांच्या जोरावरच यश संपादन करता येते, असे सांगत शिक्षणामुळे व्यक्तिमत्त्व विकास होऊन समाजात मानाचे स्थान प्राप्त होते, असे त्यांनी नमूद केले.

सामाजिक कार्यकर्ते एकनाथ भुजबळ यांनी महाविद्यालय उभारणीसाठी घेतलेल्या परिश्रमांची माहिती देत संस्थेच्या जडणघडणीचा इतिहास उपस्थितांसमोर मांडला.

मुळा एज्युकेशन सोसायटी

अध्यक्षीय भाषणात मा. उदयनदादा गडाख पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यशासाठी सातत्यपूर्ण परिश्रम, स्वअनुशासन व स्पष्ट ध्येय आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. “ध्येय निश्चित करून त्यादृष्टीने टप्प्याटप्प्याने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते,” असे ते म्हणाले. आधुनिक तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन करत त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ChatGPT सारख्या साधनांचा उपयोग ज्ञानवृद्धी, शंका निरसन व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी करावा, असा सल्ला दिला.

कार्यक्रमास राजर्षी शाहू महाराज माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयचे मुख्याध्यापक जालिंदर शेटे सर तसेच पत्रकार बन्सीभाऊ एडके यांची उपस्थिती लाभली.

समारंभात विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांतील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमोल दरंदले व प्रा. प्राजक्ता गायके यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. अमोल दहातोंडे यांनी केले.

महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला.

Kavya
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मुळा एज्युकेशन सोसायटी
मुळा एज्युकेशन सोसायटी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मुळा एज्युकेशन सोसायटी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!