नेवासा-कुकाणा येथे धारदार शस्त्र कब्जात बाळगुन दहशत निर्माण करण्या-या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की,सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.

सदर आदेशानुसार श्री किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार शाहिद शेख, गणेश धोत्रे, विष्णु भागवत, अमोल आजबे, चालक महादेव भांड यांचे पथक तयार करुन सदर पथकास नेवासा तालुक्यामध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले होते.
दिनांक 24/01/2026 रोजी नमुद पथक हे नेवासा पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत कुकाणा तरवडी गावात सौरभ राजेंद्र वडगे हा त्याचेकडे काही धारदार शस्त्र विनापरवाना कब्जात बाळगुन लोकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याची माहिती प्राप्त झाली.

त्यानुसार पथकाने बातमीतील ठिकाणी जावुन सौरभ राजेंद्र वडगे वय- 23 वर्षे रा. तरवडी, कुकाणा ता.नेवासा जि. अहिल्यानगर यास ताब्यात घेवुन ताब्यातील इसमाची व परिसराची झडती घेतली असता, त्याचे कब्जातुन, 6000/- रुपये किमतीचे दोन तलवार, 500/-रु कि.चा एक चाकु असा एकुण 6,500/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताब्यातील इसमाविरुध्द पोकॉ अमोल श्रीरंग आजबे यांचे फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाणे गु.र.नं. 151/2026 आर्म ऍ़क्ट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

