मंगल कार्यालये, केटरिंग सेवांना फलक बंधनकारक
आपला जिल्हा- घरगुती वापरासाठी असलेल्या
एलपीजी सिलिंडरचा व्यावसायिक कारणांसाठी सर्रास वापर होत असल्याच्या तक्रारी शासनांकडे वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. अवैध सिलिंडर विक्री व वापराला आळा घालण्यासाठी तालुकास्तरावर पुरवठा निरीक्षण अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपासणी पथके स्थापन करण्यात येणार असून, मंगल कार्यालये, लॉन व केटरिंग सेवांना गॅस वापराबाबत स्पष्ट सूचना देणारा फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी नुकत्याच घेतलेल्या तालुकानिहाय आढावा बैठकीत नगर शहर व नगर ग्रामीण वगळता इतर बहुतांश तालुक्यांतील गॅस एजन्सी तपासणी अहवाल ‘निरंक’ असल्याचे निदर्शनास आले. प्रत्यक्षात अवैध वापराच्या तक्रारी वाढत असताना तपासणीत त्रुटी आढळत नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र पथके स्थापन करून नियमित व अचानक तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले. या निर्देशानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी सर्व तालुक्यांमध्ये तपासणी पथकांची नियुक्ती केली आहे. मंगल कार्यालये, लॉन, हॉल तसेच केटरिंग सेवांच्या स्वयंपाकघरांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा वापर होऊ नये यासाठी विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. प्रत्येक ठिकाणी दर्शनी भागात ‘येथे केवळ व्यावसायिक गॅस सिलिंडरचाच वापर केला जाईल.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

