शब्दांकन-आमदार सत्यजित तांबे यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यासंदर्भात गुणवत्तेवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी महाराष्ट्रातील देशातील महत्त्वाचे अग्रगण्य विद्यापीठ आहे याबाबत दुमत असण्याचे कारण नाही., कारण या विद्यापीठाला सर्वोत्कृष्ट विद्यापीठ म्हणून मानाचा सरदार वल्लभभाई पटेल पुरस्कार व रुपये शंभर कोटीचे बक्षीस निधी देण्यात आला होता ही ही बाब महत्त्वाची आहे. केंद्र सरकारचे शेतीकडे व शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे साधारणपणे दुर्लक्ष होत असल्याचे आढळते त्यामुळे कृषी विद्यापीठाचे नुकसान होत आहे. रँकिंग मध्ये आलेल्या विद्यापीठाचा विचार करता राहुरी कृषी विद्यापीठाला देण्यात येणाऱ्या सुविधा, निधी, शास्त्रज्ञ संख्या यासंदर्भात आमदार तांबे यांनी चिंता व्यक्त केली असती तर ते अधिक बरे झाले असते.
या विद्यापीठाने अनेक जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ, नामवंत प्राध्यापक, कलेक्टर कमिशनर मंत्री, कॅबिनेट मंत्री व प्रशासनामध्ये उत्तम कामगिरी करणारे व्यक्तिमत्व दिले आहे तसेच शेतकऱ्यांसाठी तृणधान्य कडधान्य भाजीपाला फळे यामध्ये अनेक जाती दिले आहेत तसेच तंत्रज्ञानाच्या शिफारशी शेतकऱ्याच्या शेतावर आढळून येत आहेत या विद्यापीठाचे कुलगुरू पद पद्मश्री, जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ तसेच भारतातील नामवंत संशोधन शास्त्राचे प्रमुख डायरेक्टर इत्यादींनी भूषविले असून योग्य नेतृत्व देऊन संशोधनामध्ये फार मोठी आघाडी कृषी क्षेत्रात घेतली आहे भारतीय पातळीवर नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क मध्ये जवळजवळ 60000 संस्था भाग घेत असतात त्यापैकी ज्या संस्थांना सुविधा संशोधनाच्या प्रयोगशाळा, शास्त्रज्ञांची यथोचित संख्या, जागतिक पातळीवरचे मार्गदर्शन आवश्यक असते राहुल कृषी विद्यापीठाला एक तपानंतर आता डॉक्टर खर्चे यांच्या रूपाने यथोचित कुलगुरू लाभले आहेत त्यामुळे आता चांगला आशावाद निर्माण झाला आहे.
1966 वर्षात हरितक्रांती झाली त्यावेळेस कृषी शास्त्रज्ञांचे संशोधन तसेच शेतकऱ्यांनी केलेले कष्ट आणि त्या वेळच्या राजकीय नेत्यांनी दिलेली आर्थिक मानसिक व योग्य पाठबळ या घटकांचा प्राधान्याने समावेश होता. कृषी विद्यापीठ राहुरी संदर्भात आपल्या राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते गुण गौरव गातात तथापि पाठबळ व आर्थिक सहकार्य तसेच शास्त्रज्ञांच्या बाबतीत गुणात्मक संख्यात्मक वाढीसाठी उदासीन असतात हे यातले प्रमुख कारण आहे राजकीय पाठबळ संस्थेला मिळणे ही आवश्यक असते. आपल्या राज्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठात सारखे शैक्षणिक गुणवत्तेमध्ये आघाडीचे व संशोधनात अग्रगण्य असलेले अलौकिक विद्यापीठ आहे तथापि आज मिटीला 55 टक्के पेक्षा जास्त संशोधन शास्त्रज्ञांच्या जागा रिक्त आहेत त्यासाठी पक्षविरहित सर्व नेत्यांनी यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







