
नेवासा – होळी हा देशभर रंगांचा सण म्हणून ओळखला जात असला तरी – महाराष्ट्रात त्याचे महत्त्व वेगळे आहे.
ग्रामीण भागात शिमगा या नावाने ओळखला जातो. या दिवशी होळी प्रज्वलित करून वाईट विचाराचा त्याग करून चांगले विचार घेतले जावे असे सणामागे एक आख्यायिका आहे. पूर्वी राक्षसकुळात हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस होता. तो स्वतःला श्रेष्ठ समजत असे. देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता. त्याला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. प्रल्हाद बालपणापासून विष्णूचा परमभक्त होता. प्रल्हाद दिवस-रात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे.

नेमके हेच हिरण्यकश्यपूला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला. अखेरीस कंटाळून’ हिरण्यकश्यपूने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला. या कामात त्याने आपल्या बहिणीची मदत घेतली. होलिका हे तिचे नाव. ती राक्षसी प्रवृत्तीची आणि क्रूर होती. तिला अग्नीचे भय नव्हते. अग्नीपासून तिला कोणताच त्रास होत नव्हता.

म्हणून हिरण्यकश्यपूने लाकडाची चिता रचली. त्यावर होलिकेला बसविले आणि तिच्या मांडीवर प्रल्हादाला बसविले. परंतु प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटेच घडले.” होलिका जळून खाक झाली आणि विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादाला काहीही झाले नाही.

त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह रूपाने हिरण्यकश्यपूचा वध केला. यावेळी प्रा.विजय अडसुरे,डॉ,मनोज देशमुख,डॉ.संदीप देशमुख,संजय खर्डे,,निलेश जगताप,पंकज जगताप,विधितज्ञ संजय भोकरे,प्रकाश साळुंके,योगेश जोशी,किरण घोडेकर,विनायक नळकांडे बाळासाहेब वाल्हेकर, बोस्ट सर,विधितज्ञ चंद्रकांत कदम,दिलीप कुलकर्णी, दीपक शिंदे,अनिल शिंगी,कुलकर्णी मेजर,ज्ञानेश्वर थोटे,डॉ.सचिन साळुंके,डॉ.विजय कहार,घोडके सर,घुले सर,राजेंद्र देसरडा,विजय चोरडिया,नचिकेत कुलकर्णी, शिवम कानडे, यश देसरडा,अथर्व घोडेकर, आदित्य चौहान,संतोष गाढे,रुपेश बेद्रे,दिनेश विखोना,मयूर शिंगी,चैतन्य कुलकर्णी, ऋषी थोटे,शिवराज नानेकर,निलेश राजे,अथर्व कुलकर्णी,कृष्णा चौहान,ऋषभ आरोडा,वेदांत कुलकर्णी उपस्थित होते,पत्रकार अभिषेक गाडेकर यांनी यावेळी आभार मानले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

