होळी
होळी

नेवासा : होळी सणाच्या निमित्ताने लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गुरूदेव दत्त पीठ श्री क्षेत्र देवगड येथे संस्थानचे प्रमुख गुरुवर्य राष्ट्रसंत हभप भास्करगिरी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी म हाराज यांच्या हस्ते वेदमंत्राच्या जयघोषात होळीचे पूजन करून ती पेटविण्यात आली.श्री दत्त मंदिर देवस्थानच्या प्रांगणात झालेल्या होळी पूजन कार्यक्रम प्रसंगी सडाम ार्जन करून सुंदर रांगोळ्या घालून घालण्यात आल्या होत्या.

होळी

यावेळी गुरुवर्य भास्करगिरी बाबा व स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते होळीचे विधिवत पूजन करण्यात आले. गणपत महाराज आहेर यांनी होळीवर आधारित भजने गायली. यावेळी गुरुवर्य भास्करगिरी बाबा व स्वामींनी भगवान दत्तात्रय, श्री सम र्थ सदगुरू किसनगिरी बाबा, श्री सिद्धेश्वर मंदिर, कार्तिक स्वामी मंदिरात जाऊन विधीवत पूजनाद्वारे दर्शन घेतले. परिसरात लावण्यात आलेल्या दिव्यांनी परिसर लखलखला होता यावेळी आरती करण्यात आली. होळी पेटवून श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा की जयअवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्तअसा नामघोष यावेळी करण्यात आला.

होळी

होळी सणाच्या निमित्ताने देवगड मंदिर प्रांगणात झालेल्या होळी पूजन कार्यक्रम प्रसंगी संतसेवक नामदेव महाराज कंधारकर, गणपत महाराज आहेर, मुख्य चोपदार बाळू महाराज कानडे, शुभम महाराज बनकर, चांगदेव अण्णा साबळे, संतोष रायपुरे, सेवेकरी सरपंच अजय साबळे, महेंद्र फलटणे यांच्यासह देवगड संस्थानचे विद्यार्थी व भाविक उपस्थित होते उपस्थित महिला व पुरुष भाविकांनी होळीचे दर्शन घेऊन प्रार्थना केली.

होळी
होळी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

होळी
होळी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

होळी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!