किड्स किंग्डम

घोडेगाव—-पाश्चात्य शिक्षण पद्धती स्वीकारल्यानंतर आपल्या मुलांमध्ये हळूहळू भारतीय संस्कृतीचे विस्मरण होताना दिसत आहे. या बदलाचा थेट परिणाम कौटुंबिक नातेसंबंधांवर, सामाजिक बांधिलकीवर आणि एकूणच मूल्यव्यवस्थेवर होत आहे. आधुनिक शिक्षण आवश्यक असले तरी संस्कारांशिवाय ते अपुरे ठरते, ही जाणीव आज प्रकर्षाने जाणवत आहे.याच अनुषंगाने मुलांच्या मनात संस्कारांचे बीज रोवण्यासाठी पसायदान आनंदवन सेवाभावी संस्था एक सातत्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. समाजाला सांस्कृतिक अधिष्ठान देणाऱ्या, अनुभवसंपन्न आणि मान्यवर व्यक्तींच्या मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी, किड्स किंगडम विद्यालयाच्या सहकार्याने केले जात आहे.

किड्स किंग्डम

मुलं कितीही उच्चशिक्षित झाली, कितीही यशस्वी झाली; पण जर ती संस्कारित नसतील, तर एक दिवस आपल्या सर्वांनाच पश्चात्तापाची वेळ येऊ शकते. आपली हजारो वर्षांची समृद्ध, सुसंस्कृत परंपरा जतन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.या संकल्पनेने आज किड्स किंगडम मध्ये डॉ.हेमा माॅ.राजेंद्रजी वैरागर यांनी व्याख्यान दिले. विद्यार्थ्यांना संस्काराचे महत्त्व पटवून दिले. कोणत्या गोष्टी कराव्या कोणत्या करू नये याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमावेळी राजेंद्र वैरागर.संजय गर्जे उपस्थित होते. शाळेचे सचिव सचिन बंग यांनी मान्यवरांचा सन्मान करून आभार मानले.

किड्स किंग्डम
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

किड्स किंग्डम
किड्स किंग्डम

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

किड्स किंग्डम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!