पुरस्कार

सोनई – जागतिक महिला दिनानिमित्त माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली शारदाताई फाउंडेशन, सोनई यांच्या वतीने “कर्तव्यशील महिला” गौरव पुरस्कार, महिलांसाठी भव्य आरोग्य शिबिर व विविध फनी गेम्सचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सुनिताताई शंकरराव गडाख, कॅन्सर रोगतज्ज्ञ डॉ. पद्मजा गरुड, प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. चैताली काशीद, सौ. उषाताई गडाख, डॉ. निवेदिताताई गडाख, डॉ. किर्ती आंधळकर, डॉ. निखिल बोंबले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यशवंतराव चव्हाण डेंटल कॉलेजचे विशेष सहकार्य लाभले असून मॅक केअर व गरुड हॉस्पिटल यांचेही सहकार्य मिळाले.

पुरस्कार


कार्यक्रमात महिलांना विविध आरोग्यविषयक माहिती देण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली महिलांची विविध आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच आरोग्यविषयक सल्ला देण्यात आला.
यावेळी माजी सभापती सुनिताताई गडाख यांनी उपस्थित महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. धकाधकीच्या जीवनात महिलांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असून त्यासाठीच या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच आपण सर्व मैत्रिणींनी एकमेकांच्या सुखदुःखात कायम सोबत राहून आनंदी व आरोग्यमय जीवन जगावे, असा संदेशही त्यांनी दिला.माजी मंत्री शंकरराव गडाख यांची भाऊ म्हणून आपल्याला सदैव साथ आहे, असेही त्या म्हणाल्या.

पुरस्कार


कार्यक्रमात महिलांसाठी विविध फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महिलांनी मनसोक्त नृत्य करून कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. महिलांच्या आरोग्य व सशक्तीकरणाच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला सोनई, खरवंडी व परिसरातील हजारो महिला भगिनींची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या शेवटी शारदाताई फाउंडेशनच्या वतीने उपस्थित सर्व महिला भगिनींना स्नेहभोजन देण्यात आले.

पुरस्कार
पुरस्कार

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पुरस्कार
पुरस्कार

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पुरस्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!