विशेष रिपोर्ट सह संपादक अभिषेक गाडेकर
आपला जिल्हा – महाराष्ट्रभर महामार्गांवरील (हायवे) अनेक हॉटेल्स आणि ढाब्यांवर बेकायदेशीरपणे वीज चोरी होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत, ज्यात मीटरमध्ये फेरफार किंवा थेट लाईन टाकून लाखो रुपयांची वीज चोरली जाते. या प्रकरणी महावितरणने तपासणी मोहीम राबवून अनेक हॉटेल चालकांवर गुन्हे दाखल केले आहेत, मात्र अद्यापही अशी चोरी सुरूच आहे.
नेवासा तालुक्यात विशेष करून अहिल्यानगर-संभाजीनगर हायवेवर व इतर ग्रामीण भागातील अनेक हॉटेल्स आणि ढाबा येथे महावितरणने छापे टाकले आहेत.हॉटेल मालक रिमोट कीटचा वापर करून किंवा मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी करत असल्याचे आढळले आहे.अनेक हॉटेल चालकांनी वर्षाला लाखो रुपयांची वीज चोरली असून, एका प्रकरणात लाखो रुपयांची वीज चोरी उघडकीस आली आहे. महावितरणच्या भरारी पथकाने या प्रकरणात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले आहेत.

रात्रीच्या वेळी चोरीची लाईट घेऊन विजेचा प्रकाश पाडणारे हॉटेल चालक आता दिवसाही मोठ्या मेगावॅट क्षमतेचे बल्ब तसेच हॅलोजन आणि पंख्याचा वापर सर्रास करताना दिसत आहे दिवसाढवळ्या आणि उघड्या डोळ्यांनी ही वीज चोरी दिसूनही महावितरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी डोळ्यावर पट्टी बांधून वीज चोरीला प्रोत्साहन देत आहे.

या वीज चोरीमुळे वीजेच्या वापरात वाढ होत असून या नुकसानामुळे महावितरण विभागाही आता तोट्यात जात आहे. एका बाजुला सामान्य ग्राहकाने एक महिना विलंबाने बिल भरल्यास त्यांची वीज जोडणी तोडून मीटर काढून नेण्याची हिंमत दाखवणाऱ्या महावितरण अधिकारी वीज चोरीच्या प्रकरणामध्ये कारवाईची हिंमत दाखवतील का असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

महावितरण आधीच तोट्यात आहे आणि त्यातच या हॉटेल चालकांकडून होणाऱ्या वीज चोरीमुळे नुकसान होत आहे. दिवसाढवळ्या खुले आम होणाऱ्या वीज चोरीकडे कानाडोळा का केला जातो?एकाबाजुला तोट्यात जाणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाही. सामान्य माणसांनी बिल न भरल्यास त्यांना दंड आकारला जातो, मीटर कापून नेला जातो, तर मग या हॉटेल चालकांवर फुकटची मेहरबानी का ?असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







