जेरबंद

सोनई – लग्नाचे आमिष दाखवून एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण करणाऱ्या ४० वर्षीय आरोपीला जेरबंद करण्यात शनि शिंगणापूर पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली आहे. नेवासे तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील ही घटना घडली आहे. १४ फेब्रुवारीला पीडित मुलगी घरातून टेलरकडे जाते असे सांगून बाहेर पडली, ती परतली नाही. पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली.

जेरबंद

फिर्यादीच्या शेजारी राहणारा हरिभाऊ गंगाधर पवार (वय ४०) देखील बेपत्ता असल्याचे तपासात समोर आले. गोपनीय माहितीनुसार मुलगी आणि आरोपी पिंपळगाव फुणगी (ता. राहुरी) येथे असल्याचे समजले. दोघांनाही ताब्यात घेतले. आरोपीने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवून कोणाशी संपर्क होऊ नये म्हणून तिचा मोबाईल काढून घेतला होता. आरोपीविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

जेरबंद
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

जेरबंद
जेरबंद

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

जेरबंद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!