
नेवासा : संत गाडगेबाबा ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्षपदी रेणुका सचिन चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेची बैठक संस्थापक अध्यक्ष कारभारी गरड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत एकल महिलांच्या विविध उद्योग-व्यवसायाबाबत मार्गदर्शन व सहकार्य करणे, त्यांच्या बालकांना बालसंगोपनाचा लाभ मिळवून देणे, तसेच विविध समस्या व अडचणींबाबत सहकार्य करण्याबाबत चर्चा झाली.

तसेच पुढील एक वर्षासाठी कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्ष- रेणुका सचिन चौधरी, उपाध्यक्ष- भारत आरगडे, सचिव- कारभारी गरड, सहसचिव-येडूभाऊ सोनवणे, कोषाध्यक्ष-आप्पासाहेब वाबळे. एकल महिलांच्या समस्या सोडवणार असल्याचे अध्यक्ष रेणुका चौधरी यांनी सांगितले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

