लसीकरण

मुलींच्या सुरक्षेसाठी एच पी व्ही लसीकरण अभियानात सहभागी व्हा-डॉ.करणसिंह घुले पाटील

नेवासा(प्रतिनिधी)महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने राज्यभर सुरू करण्यात आलेल्या १४ ते १५ वयोगटातील मुलींसाठी एच पी व्ही लसीकरण अभियानाचा शुभारंभ सोमवारी दि.९ मार्च पासून नेवासा ग्रामीण रुग्णालयामध्ये करण्यात आला.गर्भाशयमुख कर्क रोगापासून मुलींचे जीवन वाचविण्यासाठी एच पी व्ही लसीकरण हा नवा पर्याय असून पालकांनी आपल्या मुलींच्या सुरक्षेसाठी लसीकरण अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन नेवासा नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले पाटील यांनी यावेळी बोलताना केले.

लसीकरण


              सलग ९० दिवस चालणाऱ्या एच पी व्ही लसीकरण नेवासा तालुक्यातील अभियानाचा शुभारंभ नेवासा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये करण्यात आला यावेळी धन्वंतरी मूर्तीचे पूजनाने करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले पाटील हे होते.ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.रामेश्वर काटे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भागवत दहिफळे,डॉ.बाळासाहेब राऊत,नगरसेवक प्रविण सरोदे,नगरसेवक महेश लोखंडे,वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहसीन बागवान,डॉ.दीपक डिंबर,नगर सिव्हिलचे डॉ. मोहळकर,स्टाफ इंचार्ज शिलाताई सुखदान व्यासपीठावर उपस्थित होते.
       यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.रामेश्वर काटे यांनी आलेल्या मान्यवर अतिथींचे स्वागत करून प्रास्ताविक केले.९ मार्च पासून दररोज सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत हे लसीकरण होणार असल्याचे सांगत या लसीकरणाबाबत सोशल मीडियावर वेगवेगळ्या अफवा पसरत असून त्यावर विश्वास न ठेवता पालकांनी आपल्या मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने १४ ते १५ वयोगटातील मुलींचे लसीकरण करून या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन केले.

लसीकरण


       तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भागवत दहिफळे म्हणाले की मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने हितावह असलेल्या एच पी व्ही लसीकरण अभियानासाठी नेवासा तालुक्यात सुट्टीचे दिवस धरून ९० दिवसात ३५०० लाभार्थ्यांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून ते आम्ही ग्रामीण रुग्णालय व पंचायत समिती आरोग्य विभागाच्या माध्यमातून पूर्ण करू असा निर्धार व्यक्त केला.
   यावेळी बोलतांना नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले पाटील म्हणाले की राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणारे अभियान आम्ही आमदार विठ्ठलराव लंघे पाटील व आमदार सौभाग्यवती सौ.रत्नमालाताई लंघे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यासाठी सामाजिक संस्थाना सहभागी करून टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न करू त्यासाठी जनजागृती करू अशी ग्वाही देत खाजगी रुग्णालयात या लसीची किंमत चार ते साडे चार हजारापर्यंत असून राज्य शासनाने मुलींच्या सुरक्षेसाठी ती मोफत देऊ केली आहे या लसीकरण अभियानाच्या माध्यमातून मुलींच्या पालकांनी आपल्या पाल्याच्या सुरक्षतेच्या दृष्टीने दृढ संकल्प करून अभियान यशस्वी करू करण्यासाठी प्रयत्न करू या असे आवाहन केले

लसीकरण


       या अभियानातील इयत्ता आठवीतील पहिली लाभार्थी विद्यार्थिनीं  ज्योती सुरजित शर्मा हिस प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.यासाठी प्रबोधन करणाऱ्या शिक्षिका सौ. यांचा ही यावेळी सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाला नेवासा येथील शिक्षक, ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी,स्टाफ इन्चार्ज, नर्सिंग स्टाफ तसेच विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.समुपदेशक
अविनाश गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले तर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भागवत दहिफळे यांनी उपस्थित मान्यवर पालक लाभार्थींचे आभार मानले.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

लसीकरण
लसीकरण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

लसीकरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!