नेवासा – नेवासा प्रेस क्लबच्या पुढाकाराने ७५ व्या वर्षी ही गेल्या पंधरा वर्षांपासून नेवासा एस टी स्टॅण्डच्या समोर वृत्तपत्र विक्रीसाठी आपल्या म लास हातभार लावणाऱ्या श्रीमती इंदूबाई जाधव यांचा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सन्मान करण्यात आला. नेवासा प्रेस क्लबचे अध्यक्ष व वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार गुरुप्रसाद देशपांडे यांच्या संकल्पनेतून हा अभिनव सन्मान करण्यात आला.

नेवासा एस टी स्टॅण्ड समोर छत्री लावून थाटविण्यात आलेल्या स्टॉलवर श्रीमती इंदूबाई जाधव यांचा हा सन्मान प्रेस क्लबच्या सर्व पत्रकार पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नेवासा नगरपंचायतचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांच्या हस्ते बुके व शाल घालून करण्यात आला.

प्रत्येक क्षेत्रात महिला ही आज पुढे येऊन आपल्या कामाची चुणूक दाखवत आहे, वयाच्या ७५ वर्षी ही आपला मुलगा संजय जाधव यांच्या वृत्तपत्र व्यवसायात खंबीरपणे पाठीशी उभ्या राहून हातभार लावण्याचे काम इंदूकाकू करत आहे त्यांचे कार्य हे महिलांसाठी प्रेरणादायी व समाजासाठी आदर्शवत असल्याचे गौरवोदगार नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांनी यावेळी बोलताना काढले व प्रेस क्लबने केलेल्या सन्मानाचे कौतुक केले.

यावेळी प्रेस क्लबचे मार्गदर्शक अशोकराव डहाळे, कार्याध्यक्ष सुधीर चव्हाण, उपाध्यक्ष कैलास शिंदे, माजी अध्यक्ष मोहन गायकवाड, मीडिया प्रमुख शंकर नाबदे, सदस्य नानासाहेब पवार, शाम मापारी, मकरंद देशपांडे, सुहास पठाडे, रमेश शिंदे, पवन गरुड, वृत्तपत्र वितरण विभागाचे सचिव अहिल्याजी घोडके, नरेंद्र महाराज सत्संग मंडळाच्या सेवेकरी सौ. संगीता सुतार उपस्थित होत्या.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







