पुण्यतिथी

महाविष्णु याग, ज्ञानेश्वरी पारायण आणि हरिनाम सप्ताह

देवगड फाटा (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथील दत्त मंदिर संस्थानच्या वतीने भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री समर्थ सद्‌गुरु किसनगिरीबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त उद्या ११ मार्च रोजी धार्मिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह, महाविष्णु याग तसेच श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पार पडणार आहे.

महोत्सवाचा शुभारंभ बुधबार ११ मार्च रोजी होणार असून सांगता सोमवार १६ मार्च रोजी होणार आहे. या कालावधीत दररोज विविध मार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे मंगल वाद्यांच्या सनई वादनाने, काकडा भजन व श्रींच्या प्रातः आरतीने दिवसात्री सुरुवात होणार आहे.

पुण्यतिथी

त्यानंतर सकाळी दर्शन प्रदक्षिणा व बंदन, गीता पाठ तसेच विष्णु सहस्रनाम
पठण असे कार्यक्रम होणार आहेत. यासोबतच श्री ज्ञानेश्वरी पारायणही करण्यात येणार आहे. दुपारच्या सत्रात भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून दुपारनंतर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. सप्ताह काळात दररोज रात्री ८.३० ते १०.३० या वेळेत कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच हरिपाठ, श्रींची सायंआरती, कीर्तन, सत्संग तसेच रात्री उशिरापर्यंत भजन-कीर्तन व कार्यक्रम होणार आहेत.

पुण्यतिथी

सप्ताहादरम्यान परिसरातील तसेच शेकडो गावांमधून भक्तांच्या दिंड्यांचे आगमन होऊन मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे. सप्ताहात विविध मान्यवर कीर्तनकार व प्रवचनकार आपली सेवा देणार आहेत. त्यामध्ये प्रकाशानंदगिरी महाराज, तुकाराम महाराज, संतोष महाराज चौधरी, ज्ञानेश्वर महाराज हजारे, गणपत महाराज आहेर तसेच हनुमंत महाराज यांची कीर्तन सेवा होणार आहे. सोहळ्याची सांगता श्री क्षेत्र देवगड संस्थानचे उत्तराधिकारी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे.

पुण्यतिथी महोत्सवानिमित्त सामुदायिक श्री किसनगिरी विजय ग्रंथ पारायणाचेही आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तन, सत्संग व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन दत्त मंदिर संस्थानतर्फे करण्यात आले आहे.

पुण्यतिथी
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पुण्यतिथी
पुण्यतिथी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पुण्यतिथी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!