पैठणी

नेवासा-तालुक्यातील कुकाणा येथील मैत्रेय महिला मंडळाच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या खेळ पैठणीचा आणि जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमास महिलांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धे तील पैठणीच्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी डॉ. प्रिती नांगरे तर नृत्य स्पर्धेत कांचन पवार या प्रथम विजेत्या ठरल्या. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती मैत्रेय महिला मंडाळाच्या अध्यक्षा डॉ. विद्या कोलते यांनी दिली.स्पर्धा, उखाणे, गायन, फुगडी, ग्रुप डान्स, भारुड याबरोबरच विविध स्पर्धाचे करण्यात आले होते.

पैठणी

या विजेत्या स्पर्धकांना विश्वंभर मोबाईल शॉपी, ज्ञानेश्वर मोबाईल शॉपी, साई श्रद्धा कन्स्ट्रकशन, औदुंबर कलेक्शन, देडगावकर ज्वेलर्स, सुपर मार्ट, स्वागत मोबाईल शॉपी यांच्यावतीने विजेत्या स्पर्धकांना पैठणी देण्यात आल्या. यामध्ये प्रथम डॉ. प्रिती नांगरे, द्वितीय समीक्षा गाडेकर, तृतीय प्राप्ती बोरुडे, चौथे संपदा ससे, पाचवे हर्षा मुनोत तर नृत्य स्पर्धेसाठी संतकृपा फर्निचर व नारायणगिरी ग्रामीण बिगर शेती पतसंस्था यांच्यावतीने विशेष बक्षीस देण्यात आले.

या नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्रथम कांचन पवार तर द्वितीय बक्षीस सुमन जगताप, विजया जोजार यांना विभागून देण्यात आले. तृतीय बक्षीस प्रितम वाघमारे यांना पटकविले.

पैठणी

या सर्व यशस्वी स्पर्धकांना सरपंच लताताई अभंग, अर्चना कांडेकर, अश्विनी विश्वंभर, अनिता कचरे, स्वाती कासार, सिमा भंडारी, सोनाली सोनवणे, अनिता सोनवणे, कविता कासार, अनघा देडगावकर, कविता काळे यांच्याहस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.

newasa news online
पैठणी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पैठणी
पैठणी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पैठणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!