कारवाई
कारवाई

नेवासा फाटा – तीनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या दोघांसह बंधपत्राचे उल्लंघन करणाऱ्या एकावर अपर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या आदेशावरुन प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याने नेवासा तालुक्याच्या गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिते अंतर्गत यातील तीन व तीनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या दोघांची न्यायालयिन कोठडीत रवानगी करण्यात आली असून बंधपत्राचे उल्लंघन करणाऱ्या एकाचे बंधपत्र रद्द करुन त्याच्यावर 30 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

कारवाई

जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशावरुन अहिल्यानगर पोलीस दलाच्या श्रीरामपूर विभागातील तीन व तीनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या आरोपींविरुद्ध कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर यांच्याकडे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 129 खाली बंधपत्र घेणेकामी शेवगांवचे उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु यांनी प्रस्ताव सादर केले होते.

कारवाई

त्यापैकी हरिहर उर्फ बंटी भगीरथ औटी (वय-23), रा.तामसवाडी, ता.नेवासा तसेच आकाश प्रविण तांबे (वय-22), रा.पानेगांव, ता.नेवासा या सोनई पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील दोन गैरअर्जदारांना भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 135(3) खाली जामीनदारांसह अंतरिम बंधपत्राबाबत आदेशित करुन तसेच वेळोवेळी मुदतवाढ देऊनही त्यांच्याकडून प्रतिसाद दिला जात नसल्याने या दोघांचीही दि.10 मार्च रोजी आठ दिवसांसाठी न्यायालयिन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

कारवाई

तर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे कलम 136 खाली चांगल्या वर्तणुकीचे जामीनदारांसह दोन वर्षांकरीता अंतिम बंधपत्र करुन देणाऱ्या अक्षय रामदास चेमटे (वय-25), रा.घोडेगांव, ता.नेवासा याने बंधपत्राच्या कालावधीत परत गुन्हेगारी कृत्य करुन बंधपत्राचे उल्लंघन केल्याबाबतचा अहवाल सोनई पोलीस ठाण्याकडून अपर पोलीस अधिक्षकांकडे सादर करण्यात आला. कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 491 व 492 अंतर्गत बंधपत्राचे उल्लंघन करणाऱ्या चेमटे याचे बंधपत्र रद्द करुन त्याच्यावर याप्रकरणी 30 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.

कारवाई

अपर पोलीस अधिक्षकांच्या या कारवाईने तालुक्यातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून यामुळे गुन्हेगारांच्या मुजोरीला चाप लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जाऊ लागली आहे.

कारवाई

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

कारवाई
कारवाई

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

कारवाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!