आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
जयश्री प्रवीण गडाख
जयश्री प्रवीण गडाख

सोनई – श्री जगदीश प्रसाद झांबरमल टिबरेवाला युनिव्हर्सिटी, झुंझुनू येथे रसायनशास्त्र विषयात संशोधन करणाऱ्या संशोधक सौ. जयश्री प्रवीण गडाख (काकडे) यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी “सिंथेसिस, कॅरेक्टरायझेशन अँड बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन ऑफ ट्रायाझोल डेरिव्हेटिव्हज” या विषयावर संशोधन कार्य पूर्ण केले. हे संशोधन पूर्ण करण्यासाठी त्यांना चार वर्षांचा कालावधी लागला.

घरकाम, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि महाविद्यालयातील शैक्षणिक कामकाज सांभाळत त्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक हे संशोधन पूर्ण केले. हे संशोधन डॉ. भूपेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ. पोपट मोहिते आणि प्रा. एन. डी. भोगे यांच्या सहमार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आले.

जयश्री प्रवीण गडाख

या संशोधनामुळे औषधनिर्मिती क्षेत्रात ट्रायाझोल संयुगांचा वापर वाढविण्यासाठी नवे मार्ग उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचे संशोधकांनी व्यक्त केले आहे. या संशोधन कार्यासाठी मुळा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक यशवंतराव गडाख तसेच माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व पाठबळ मिळाल्याचे डॉ. जयश्री गडाख यांनी सांगितले.

कौटुंबिक जबाबदाऱ्या असूनही कुटुंबीयांनी वेळोवेळी डॉक्टरेट पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले, असेही त्या म्हणाल्या. या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थी आणि समाजाच्या हितासाठी व्हावा यासाठी पुढेही प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
अर्थ व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती सुनीलराव गडाख, मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख, माजी सभापती सौ. सुनीताताई गडाख, सचिव उत्तमराव लोंढे, सहसचिव विनायकराव देशमुख, प्रवीण गडाख, मुळा पब्लिक स्कूलचे माजी प्राचार्य रामराव काकडे, श्रीकांत काकडे तसेच सोनई महाविद्यालयाचे प्राचार्य गोरक्षनाथ कल्हापुरे आदींनी डॉ. जयश्री गडाख यांचे अभिनंदन केले आहे.

जयश्री प्रवीण गडाख

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

जयश्री प्रवीण गडाख
जयश्री प्रवीण गडाख

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

जयश्री प्रवीण गडाख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!