पाणपोई सारख्या पुण्याच्या उपक्रमाला सर्वांचा हातभार देखील गरजेचा-महंत श्री उद्धवजी महाराज मंडलिक
नेवासा(प्रतिनिधी) सालाबाद प्रमाणे यावर्षीही नेवासा येथील श्रीरामपूर रोडवर असलेल्या श्री खोलेश्वर गणेश मंदीर स्ट्रस्टच्या वतीने थंडगार पाणी जारच्या माध्यमातून पाणपोई सुरू करण्यात आली.या पाणपोईचे उदघाटन सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत गुरुवर्य ह .भ. प .उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या हस्ते गुरुवारी दि.१२ मार्च रोजी करण्यात आले.
पाणपोई सारख्या पुण्याच्या उपक्रमाला सर्वांचा हातभार देखील गरजेचा असून यासाठी अशा स्तृत्य उपक्रमासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे असे प्रतिपादन महंत श्री उद्धवजी महाराज मंडलिक यांनी यावेळी बोलताना केले.

यानिमित्ताने श्री खोलेश्वर गणपतीचे विधिवत पूजन महंत श्री उध्दवजी महाराज मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर मंदिराजवळ सुरू करण्यात आलेल्या पाणपोईचे उदघाटन श्रीफळ वाढवून करण्यात आले.इंजिनिअर सुनीलराव वाघ यांनी आलेल्या मान्यवर व भाविकांचे स्वागत केले.उपस्थित भक्त परिवाराच्या वतीने महंत श्री उद्धवजी महाराज यांचे संतपूजन करण्यात आले.
रखरखत्या उन्हामध्ये तहानलेल्या जीवांसाठी पाणपोई सुरू करून श्री खोलेश्वर गणेश मंदिर स्ट्रस्टने पुण्याचे कार्य सुरू केले आहे.हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार महंत उध्दवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांनी काढले अशा उपक्रमासाठी सर्वांनी हातभार लावावा असे आवाहन करून त्यांनी पाणपोई उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.यावेळी नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले यांनी पाणपोई उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

यावेळी झालेल्या पाणपोई उदघाटन कार्यक्रम प्रसंगी खोलेश्वर मंदिर स्ट्रस्टचे विश्वस्त इंजिनिअर सुनीलराव वाघ,नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले, होमगार्ड समादेशक बाळासाहेब देवखिळे,सेवानिवृत्त नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड,अण्णासाहेब लोखंडे, रोहिदास गारुळे,भास्करराव कणगरे,विमा कंपनीचे विभागीय अधिकारी किशोर गारुळे,सुविचार लेखक विक्रांत गोसावी,माजी नगरसेवक संदीप बेहळे,माजी सरपंच सतीश गायके,कृष्णा परदेशी,वसंत रासने, छोटूभाऊ जिरे,नारायण पोतदार,सामाजिक कार्यकर्ते सचिन भांड, कैलास ईरले,किरण दारुंटे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर देवस्थान विश्वस्त संदीप बेहळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

