आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
ज्ञानेश्वरी

नेवासा- सामाजिक भावनेतून काम करणाऱ्या प्रतिष्ठानच्या पुस्तकाने मनाला उभारी मिळाली. जगभरात काम केले परंतु पहिला पुरस्कार यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचा स्वीकारला. जीवनात नियती व निश्चयाचा गुणाकार केल्यास नवनिर्मिती होते. संत ज्ञानेश्वर माऊलींनी नेवाशाच्या भूमीत ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती केली, ही भूमी विशेष आहे. संत हे मानवरूपातले देव आहेत पसायदानाची पहिली ओळ जीवनाला स्फूर्ती व दिशा देते. ज्ञानेश्वरी हो अवघ्या जगाची आहे. विश्व विचारांचा विचार ज्ञानेश्वरीतून मिळतो, असे गौरवोद्वार जागतिक घडामोडीचे अभ्यासक डॉ. संदीप वासलेकर यांनी काढले.

ज्ञानेश्वरी

नेवासा येथील पैस खांब मंदिर देवस्थान येथे विचारवंत डॉ. संदीप वासलेकर यांना कृतज्ञता पुरस्कार महंत उद्धव महाराज मंडलिक, महंत नारायणगिरी महाराज, वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के यांच्याहस्ते व यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे मार्गदर्शक माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली तसेच हभप जगन्नाथ महाराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत

देण्यात आला. याप्रसंगी ज्ञानेश्वर देवस्थानचे अध्यक्ष मा.आ. पांडुरंग अभंग, अरुण शेवते, दत्तात्रय अत्रे, विश्वासराव गडाख, मा. सभापती सुनीताताई गडाख, सुमतीताई घाडगे, अँड देसाई आबा देशमुख, उषाताई गडाख, बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील, दिलीपराव पवार, रावसाहेब कांगुणे, देविदास साळुंके, किशोर सुकाळकर, अशोकराव मंडलिक, तुकाराम नवले, रामभाऊ जगताप, ज्ञानेश्वर शिंदे, कैलास जाधव, कृष्णा पिसोटे, बाळासाहेब नवले,गणेश ढोकणे, जितेंद्र कुन्हे, संजय सुखदान आदी उपस्थित होते.

माजी मंत्री शंकरराव गडाख म्हणाले, संत ज्ञानेश्वरांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीत कृतज्ञता पुरस्कार देताना मनाला विशेष आनंद वाटतो. जीवनात पुढे जायचे असेल तर डॉ. वासलेकरांसारखे व्यक्तिमत्त्व दीपस्तंभ मानून काम करा, असे आवाहन तरुणांना केले.

महंत मंडलिक म्हणाले, विज्ञान व ज्ञान जेथे एकत्र नांदते तेथे समाज निर्मिती होते. वेदांतचार्य म्हस्के म्हणाले, या कार्यक्रमात सर्वसामान्य शेतमजूरापासून ते वकील, डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, विद्यार्थी यांची मांदियाळी जमली. यामुळे पैस खांब मंदिरात जणू पंढरी अवतरली. सर्वसामान्य परिस्थितीतून लोकसेवा आयोगातून यश मिळवल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक अविनाश कुसळकर, यास्मिन शेख, सुजित दरंदले यांचो नगरनियोजन अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल तसेच पीएचडी मिळवल्याबद्दल डॉ. जयश्री गडाख यांचा डॉ. संदीप वासलेकर यांच्याहस्ते विशेष सन्मान करण्यात आला. १ लाखांची पुस्तके वासलेकर यांनी विद्यार्थ्यांना भेट दिली.

ज्ञानेश्वरी
ज्ञानेश्वरी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

ज्ञानेश्वरी
ज्ञानेश्वरी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

ज्ञानेश्वरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!