संत ज्ञानेश्वर
पापमोचनी

नेवासा- फाल्गुन वद्य पापमोचनी एकादशीच्या निमित्ताने नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये हजारो भाविकांनी पैस खांबाचे दर्शन घेतले. यावेळी शेकडो दिंड्यांनी ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ असा गजर करत हजेरी लावली. दिंड्यांचे देवस्थान विश्वस्त देविदास महाराज म्हस्के यांनी स्वागत केले.

पापमोचनी

पहाटेच्या सुमारास देविदास महाराज म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत पैस खांबास अभिषेक करण्यात आला. यावेळी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. किशोर गळनिंबकर, डॉ. शंकरराव शिंदे, डॉ. निलेश लोखंडे, डॉ. मनिषा वाघ, डॉ. निर्मला सांगळे, डॉ. संदीप देशमुख, डॉ. गणेश नांदे, डॉ. वरुणराज देवरे यांच्या हस्ते पैस खांबाचे पूजन करण्यात आले.

पापमोचनी

गंगापूर तालुक्यातील नागापूर, शेंदूरखादा येथील भजनी मंडळ तर दुपारच्या संत्रात अंमळनेर, खुपटी भजनी मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम झाला. करजगावं व शिरगाव येथील सेवेकऱ्यांनी मंदिरात सेवा दिली.

पापमोचनी

भाविकांनी मंदिरातील विठ्ठल रुख्मिणी, संत ज्ञानेश्वर माऊली पैस खांब, भगवान दत्तात्रय, करविरेश्वर, वै. बन्सी महाराज तांबे समाधी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मंदिर परिसर गर्दीने गजबजून गेला होता. परिसरात विविध दुकाने उभारण्यात आल्याने यात्रेचे स्वरूप आले होते.

देविदास महाराज म्हस्के यांचे कीर्तन झाले. विलास नांगरे परिवाराच्या वतीने शाबुदाना खिचडीचे वाटप करण्यात आले.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पापमोचनी
पापमोचनी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पापमोचनी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!