
नेवासा – महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना 1968 वर्षात झाली त्याच्यानंतर विद्यापीठाने संशोधनाची घोडदौड सुरू करून कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण पिकांची वाण व तंत्रज्ञानाच्या शिफारशी देऊन नेत्र दीपक यश मिळविले. कृषी शिक्षण संशोधन व विस्तार कार्य करून शेतीच्या उत्पादनामध्ये क्रांतिकारक बदल घडवले.

दिनांक 15 मार्च 2026 रोजी दीक्षांत समारंभ मोठ्या दिमाखात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडला. पदवीदान समारंभात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देऊन सन्मानित करण्यात आले हे कार्यक्रमाचे एक आगळे व वेगळे स्वरूप होते. महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल जिष्णु देव शर्मा यांच्या नवीन नियुक्तीनंतर या शुभ कार्याने महाराष्ट्रात सुरुवात झाली हाही एक चांगला योगायोग मानावा लागेल.

या पदवीदान समारंभात डॉक्टर अशोक कुमार सिंग यांनी दिलेले ज्ञानयुक्त भाषण कृषी अभ्यासकांना पर्वणी ठरली. कृषी क्षेत्रातील पदवी पदव्युत्तर व पीएचडी डिग्री घेताना विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. मुख्यमंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना कृषी उद्योजक होऊन अनेकांना नोकऱ्या देणारे व्हावे ही केलेले आवाहन काळाशी सुसंगत वाटले.

कार्यक्रमाची सुरुवात महामहीम राज्यपाल यांनी मराठी भाषेतून केल्यामुळे भव्य सभागृहात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील व महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे नवनिर्वाचित कुलगुरू डॉक्टर विलासराव खर्चे यांनी दीक्षांत समारंभ यशस्वी होण्यासाठी अतिशय उत्कृष्ट नियोजन व शास्त्रज्ञ प्राध्यापक कर्मचारी वृंद यांना केलेले मार्गदर्शन महा मोलाचे ठरले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

