सोनई : श्री क्षेत्र देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज यांनी गुढीपाडव्या निमित्त माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली व जेष्ठ साहित्यिक माजी खा. यशवंतराव गडाख यांची प्रकृतीची विचारपूस केली.

महंत भास्करगिरी महाराज व मा खा यशवंतराव गडाख यांनी विविध विषयांवर संवाद साधला व जुन्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी महंत भास्करगिरी महाराज यांचे संतपुजन शारदाताई गडाख, यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उदयन गडाख, उद्योजक विजयराव गडाख, माजी सभापती सुनीताताई गडाख, डॉ. निवेदिताताई गडाख गडाख यांनी केले. याप्रसंगी बोलतांना उदयन गडाख म्हणाले, गुढीपाडव्याच्या दिवशी आमचे श्रद्धास्थान गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांची आमच्या निवासस्थानी झालेली भेट अध्यात्मिक अनुभूती व ऊर्जा देणारी आहे. समाजकारणात काम करत असताना भास्करगिरी महाराज यांचे आशीर्वाद नेहमी पाठीशी असतात असे उदयन गडाख म्हणाले.

महाराजांनी भेट दिल्याबद्दल उदयन गडाख यांनी आभार मानले. याप्रसंगी संतसेवक बाळू महाराज कानडे, राहुल ठोंबरे, संदीप साबळे आदी उपस्थित होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.






