आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
गॅस

नेवासा – इंधन पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेण्याऐवजी नेवासा तालुक्यात घरगुती लाल सिलिंडरमधून व्यावसायिक (कमर्शियल) सिलिंडरमध्ये बेकायदेशीर ‘रिफिलिंग’ सुरू असल्याचे समोर आले आहे. कोणतीही सुरक्षा न पाळता सुरू असलेला हा प्रकार केवळ बेकायदेशीरच नाही, तर सार्वजनिक सुरक्षेसाठी गंभीर धोका निर्माण करणारा ठरत आहे.


व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा मर्यादित झाल्याने हॉटेल व ढाबा चालक अडचणीत आले आहेत. मात्र, या अडचणीवर तोडगा म्हणून बेकायदेशीर मार्ग स्वीकारला जात असल्याचे चित्र आहे. थेट वापर टाळण्यासाठी काही ठिकाणी एका सिलिंडरमधून दुसऱ्यात गॅस भरला जात आहे. या प्रक्रियेत कोणतीही अधिकृत यंत्रणा वापरली जात नाही आणि सुरक्षा नियमांचे पूर्णपणे उल्लंघन केले जात आहे.रहिवासी भागात सुरू असलेली ही ‘रिफिलिंग’ची ठिकाणे संभाव्य अपघाताची केंद्रे ठरत आहेत. गॅस गळती किंवा स्फोट झाल्यास मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ बेकायदेशीरतेपुरता मर्यादित न राहता सार्वजनिक सुरक्षेचा गंभीर मुद्दा बनला आहे.

गॅस


दरम्यान, या प्रकारामुळे घरगुती गॅसचा तुटवडा अधिक तीव्र झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर गॅस मिळत नसताना, काही व्यावसायिकांकडे त्याचा सहज साठा उपलब्ध होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे पुरवठा व्यवस्थेतील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. गॅस एजन्सी व पुरवठा विभागाचे संगनमत आहे की काय? असा संशयही यानिमित्ताने व्यक्त केला जात आहे.
स्थानिक पातळीवरील नियोजनाचा अभाव आणि नियंत्रण यंत्रणेतील त्रुटी यामुळे ही समस्या अधिक गंभीर झाली आहे. गॅसटंचाईतून निर्माण झालेला हा ‘रिफिलिंग’चा प्रकार आता नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसत आहेत.घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर आणि बेकायदेशीर रिफिलिंग हा कायद्याने दंडनीय गुन्हा आहे. तरीही हा प्रकार सुरू असल्याने संबंधित यंत्रणांच्या देखरेखीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. वेळेत प्रभावी उपाययोजना न केल्यास, भविष्यात मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.

गॅस
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गॅस
गॅस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गॅस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!