नेवासा : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांनी कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना विविध बॅनर तसेच जाहिरातींसाठी पवार यांचे केवळ एकच अधिकृत छायाचित्र वापरण्याचे आवाहन केले आहे. पार्थ पवार यांनी सोशल मीडियाद्वारे ही विनंती करताना अजितदादांच्या कार्याप्रति आदर व्यक्त करण्यासाठी एकसंधता आणि शिस्त पाळणे आवश्यक असल्याचे नमूद केले.

एकाच अधिकृत फोटोचा वापर केल्यास पक्षाची एकात्मता अधिक प्रभावीपणे दिसून येईल, असे पार्थ पवार यांनी सांगितले. अजितदादांनी शिस्त आणि विकासाचा ध्यास हीच त्यांची खरी ओळख असून, त्यांना योग्य आदरांजली वाहण्यासाठी समर्थकांनी या सूचनेचे पालन करावे. दादांच्या विचारांचा वारसा जपत महाराष्ट्राच्या प्रगतीसाठीसाठी सर्वांनी एकदिलाने पुढे जावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.






