शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत जाहीर करून संकटात सापडलेल्या बळीराज्याला आर्थिक मदत द्या – माजी खासदार सदाशिव लोखंडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी!
नेवासे (प्रतिनिधी) – शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अवकाळी पाऊस,वादळी वारा आणि गारपीटमुळे झालेल्या शेती पिकांच्या भीषण नुकसानीबाबत तात्काळ पंचनामे करून विशेष आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,शिर्डी लोकसभा मतदारसंघातील श्रीरामपूर,राहुरी,संगमनेर,अकोले,राहाता आणि नेवासे या तालुक्यांमध्ये मंगळवार,बुधवार व गुरुवार दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस,वादळी वारे व गारपीट झालेली आहे
या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या तसेच काढणीस आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असून संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी मोठा हतबल झालेला आहे त्यामुळे
या भीषण नुकसानी बाबत तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत तातडीने जाहीर करण्याची मागणी शिर्डी लोकसभेचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विशेषतः द्राक्ष,आंबा,डाळिंब,टरबूज या फळपिकांसह गहू,हरभरा व चारा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पिके पूर्णतः जमीनदोस्त झालेली असून,काढणीस आलेली गहू पिकाचे अक्षरशः मोठे नुकसान झालेले आहे

अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण हंगामाचे उत्पन्न या आपत्तीमुळे नष्ट झाले असून प्राथमिक माहितीनुसार श्रीरामपूर तालुका ३२ गावांमध्ये सुमारे १,०७६ हेक्टर क्षेत्रावरील 33 टक्के पेक्षा जास्त पिकांचे नुकसान, नेवासे तालुका : १७ गावांमध्ये ४५२ हेक्टर क्षेत्रावरील ४५२ शेतकरी बाधित,राहाता तालुका: १७ गावांमध्ये ८७७ शेतकरी व ५४६ हेक्टर क्षेत्र बाधित,संगमनेर तालुका १८० शेतकऱ्यांचे सुमारे १२७ हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून शेतकरीवर्ग आर्थिकदृष्ट्या पूर्णतः कोलमडून गेलेला आहे त्यामुळे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संकटातून सावरण्यासाठी आर्थिक मदतीचा दिलासा मिळणे अत्यावश्यक आहे.
तरी आपण सर्व संबंधित तालुक्यांमध्ये तात्काळ व अचूक पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत व बाधित शेतकऱ्यांना शासन नियमांनुसार नव्हे तर विशेष बाब म्हणून वाढीव नुकसान भरपाई जाहीर करावी,फळबाग व बहुवर्षीय पिकांसाठी स्वतंत्र विशेष पॅकेज जाहीर करावे शेतकऱ्याचे पीककर्ज तात्पुरते स्थगित करून व्याज माफीचा निर्णय घ्यावा आणि विमा कंपन्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याचे निर्देश देऊन या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन शेतकरी बांधवांना न्याय व दिलासा द्यावा अशी मागणी माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,सुनित्रा पवार यांच्याकडे केली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.






