आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
ईद

नेवासा : शहरासह तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वपक्षीय, तसेच सर्वधर्मीयांनी मुस्लीम बांधवांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्यातून राष्ट्रीय ऐक्याचे दर्शन घडले. नेवासा येथे खुपटी रोडवरील ईदगाह मैदानावर रमजान ईदची नमाज अदा करण्यात आली. मौलाना अब्दुल फारुक यांनी नमाज पठन केले. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे, नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले पाटील यांनी ईदनिमित्त मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

ईद

पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. संत तुकाराम महाराज मंदिर चौकात माजी मंत्री शंकरराव गडाख व. आम आदमी पार्टीचे.. अॅड. संजय सुखदान यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या. सकाळी साडेसात वाजता नुराणी मशिदीमध्ये, तर ८ वाजता नेवासा फाटा येथील मदिना मशीद, सकाळी ८.३० वाजता नेवासा येथील मरकस मशिदीमध्ये ईदची नमाज अदा करण्यात आली. यानिमित्त घरोघरी शिरखुर्मा, गुलगुले पार्टीचे आयोजन केले होते.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

ईद
ईद

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

ईद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!