आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
वैष्णोदेवी

नेवासा : चैत्र नवरात्रीत झालेल्या प्रचंड गदीमुळे शनिवारी वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी ४ वाजेपर्यंत ३९,००० भाविकांनी गुहा मंदिरात दर्शन घेतले. १९ मार्च रोजी सुरू झालेल्या चैत्र नवरात्रीमुळे भाविकांच्या गर्दीत मोठी वाढ झाली आहे.

नवरात्रीचा हा उत्सव २७मार्चपर्यंत सुरू राहणार असून, देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता मंदिर समितीला वाटत आहे. मंदिरात प्रचंड गर्दी
झाल्यामुळे यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे, असे मंदिर समितीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

वैष्णोदेवी

यात्रेच्या स्थगितीची घोषणा पोलीस वाहनांमार्फत करण्यात आली असून, रविवारी पहाटे ४ वाजल्यापासून नवीन नोंदणी सुरू होईल. शनिवारी ३९,००० हून अधिक भाविक जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील त्रिकुटा टेकड्यांवर वसलेल्या पवित्र कटरा शहरात पोहोचले आणि त्यांनी माता वैष्णोदेवी मंदिरात प्रार्थना केली. प्रचंड गर्दीमुळे शनिवारी दुपारी ४ वाजता यात्रा स्थगित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, नोंदणीनंतर १०,००० हून अधिक भाविक गुहा मंदिराच्या दिशेने जात आहेत. यात्रा सुरक्षित आणि सुरळीत होण्यासाठी प्रशासनाने कटरा बेस कॅम्पवर आणि मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

वैष्णोदेवी
वैष्णोदेवी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

वैष्णोदेवी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!