सोनई- श्री शनैश्वर देवस्थान, शनिशिंगणापूर येथील मानधन कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर बनला असून, तब्बल सात महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही ठोस निर्णय होत नसल्याने आता कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानात कार्यरत असलेले सर्व मानधन कर्मचारी नियमितपणे आपली सेवा बजावत आहेत. मात्र, मागील सात महिन्यांपासून त्यांचे वेतन प्रलंबित असून त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर
उपासमारीची वेळ येण्याची स्थिती निर्माण झाली आहे. दैनंदिन गरजा भागवणेही कठीण झाले असून, आर्थिक अडचणींचा मोठा फटका बसत आहे.

या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी यापूर्वीही प्रशासन, शनिशिंगणापूर देवस्थान समिती तसेच उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा निवेदन दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणे सेवा दिली असून, देवस्थानाच्या कामकाजात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सातत्याने योगदान दिले आहे. तरीही त्यांच्या हक्काच्या वेतनासाठी वारंवार पाठपुरावा करावा लागत आहे, ही दुर्दैवी बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

येत्या १० दिवसांत त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाला नाही, तर ते ३० मार्चपासून उपोषणाला बसणार आहेत. यानंतरही प्रश्न सुटला नाही, तर सामूहिक आत्मदहनाचा टोकाचा निर्णय घेण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या संभाव्य गंभीर परिस्थितीची पूर्ण जबाबदारी प्रशासन व संबंधित यंत्रणांवर राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.शिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी सात महिन्यांपासून प्रलंबित वेतनासाठी मागणीचे निवेदन प्रशासनाला दिले आहे. अन्यथा उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.






