आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
एटीएम

नेवासा – भारतात नवं आर्थिक वर्ष १ एप्रिल २०२६ पासून सुरु होत आहे. एचडीएफसी बँकेसह इतर बँका एटीएम कार्डच्या वापरासंदर्भातील नियम बदलणार आहेत. यामध्ये एटीएम कार्डवरुन पैसे काढण्याचे नियम, एटीएम वापराचं शुल्क यासंदर्भातील विविध बदलांचा समावेश आहे.

एचडीएफसी बँक : एचडीएफसी बँक आता यूपीआय आधारीत पैसे काढणे देखील फ्री एटीएम व्यवहार मर्यादेत जोडेल. म्हणजेच यूपीआयद्वारे एटीएम मधून पैसे काढल्यास ते एटीएम व्यवहार मर्यादेशी जोडलं जाईल. ही मर्यादा ओलांडल्यानंतर ग्राहकांना एटीएम व्यवहारावर शुल्क द्यावं लागेल. नवा नियम १ एप्रिल २०२६ पासून लागू होईल.

बँकेच्या नियमानुसार मोफत एटीएम व्यवहारांची मर्यादा ओलांडल्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी २३ रुपयांचं शुल्क द्याव लागेल. एचडीएफसी बँकेनं महानगरांमध्ये मोफत एटीएम व्यवहारांची मर्यादा ३ व्यवहार ठेवली आहे. नॉन मेट्रो शहरांमध्ये ५ वेळा एचडीएफसी बँकेच्या एटीएम कार्डवरुन पैसे मोफत काढू शकतात.

पंजाब नॅशनल बँक : या सरकारी बँकेनं देखील एटीएम कार्डद्वारे पैसे काढण्याच्या नियमात बदल केला आहे. पंजाब नॅशनल बँकेचा नवा नियम १ एप्रिलपासून लागू होणार आहे. बँकेचे ग्राहक १ एप्रिल पासून एटीएम कार्डचा वापर करुन एका दिवसात १ लाख रुपयांऐवजी ५० हजार रुपये काढू शकतात. हा नियम काही डेबिट कार्डसाठी लागू असेल

एटीएम
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

एटीएम
एटीएम

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

एटीएम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!