नेवासा- ना डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांची भोंदू बाबा संदर्भीय विधाने स्पष्ट व सडेतोड भूमिका निश्चितच योग्य वाटते. महाराष्ट्रामध्ये आजच्या प्राप्त स्थितीत भोंदू बाबा अशोक खरात यांच्या अघोरी कृत्याबद्दल सर्वसामान्यांना धक्का बसला आहे. हिंदू धर्म परंपरेने तात्विक व वैचारिक दृष्ट्या महान आहे तथापि धर्माचा गैरवापर करून अनेक भोंदू बाबा समाजाशी दिशाभूल करू अनैतिक कृत्य करून धर्माला बदनाम करतात त्यामुळे समाजाने धर्मांध होऊ नये.
सध्या समाज अतिशय गतिमान झाला आहे त्यामुळे ह भ प महाराजांच्या वाईट कृत्याबद्दल माहिती समाजासमोर येत नाही ह भ प महाराजांचे शिष्य गण स्वार्थासाठी फक्त चांगली बाजू समाजासमोर भडकपणे मांडतात त्याचा गैरफायदा भोंदू बाबा घेतात निश्चितच काही आजच्या काळाची साधुसंत चांगले कार्य करत आहे समाजामध्ये वैचारिक प्रदूषण होत असून त्यामुळे अत्याचार अनाचार दुराचार व बलात्कार घडत आहेत त्यामुळे समाजकारणासाठी समाजाला योग्य दिशा देण्यासाठी ह भ प महाराजांची गरज असून त्यांचे कार्य तात्विक व मौलिक विचार उल्लेखनीय आहेत तथापि डोळसपणा समाजामध्ये असणे गरजेचे असून त्यासाठी युवकांनी काम केले पाहिजे अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच जादूटोणा कायदा यासाठी युवकांनी पुढाकार घेऊन विविध उपक्रम राबविले पाहिजेत असे प्रतिपादन डॉक्टर अशोकराव ढगे यांनी केले


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.






