
नेवासा – नेवासा शहर व उपनगरांमध्ये सुरू असलेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली असून नेवासा नगरपंचायतीवर ‘हंडा सह दंडुका मोर्चा’ काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ॲड. संजय सुखदान यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, गेल्या अनेक दिवसांपासून शहरात पाणीपुरवठा अत्यंत अनियमित पद्धतीने होत असून आठ ते दहा दिवसांच्या अंतरानेच पाणी मिळत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही नगरपंचायतीकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या असून नगरपंचायत कार्यालयावर हंड्यासह दंडुका मोर्चा काढून अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या निषेधार्थ काळी शाई फेकण्याचा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मोर्चाची निश्चित तारीख न देता पुढील आठ दिवसांत मुख्याधिकारी उपस्थित असतील त्या दिवशी अचानक मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच, या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाचीच राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नागरिकांना नियमित पाणीपुरवठा सुरू झाल्याबाबत प्रशासनाने तात्काळ लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या इशाऱ्यामुळे नेवासा नगरपंचायत प्रशासनासमोर पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.






