आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
समाजभूषण

नेवासा – मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सुसंकल्प साहित्यिक व सामाजिक संस्था तरवडी यांच्या वतीने एक दिवसीय मराठी साहित्य संमेलन श्रीक्षेत्र तरवडी तालुका नेवासा येथे संपन्न झाले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब पवार, उद्घाटक म्हणून देसाई आबा देशमुख, स्वागत अध्यक्ष राजेंद्र फड, जेष्ठ साहित्यिक तथा वगसम्राट सायमन भारस्कर, आला बाबुराव फेम कांबळे साहेब, जेष्ठ पत्रकार डॉ. श्याम जाधव, सुप्रसिद्ध साहित्यिक व कवयित्री सौ सुनंदाताई वाळुंज, अब्दुल भैया शेख युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस, स्वराज्य फिल्म प्रोडक्शन चे दिग्दर्शक गिरीश राजूरकर, राजेंद्र बांगर, वारकरी मंच प्रदेश प्रसिद्धीप्रमुख रामभाऊ आवारे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते एकदिवसीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. त्यानंतर संमेलनाचे प्रास्ताविक आयोजक साहित्यिक सायमन भारस्कर यांनी केले.

प्रस्ताविकांमध्ये त्यांनी लोकसाहित्याचा ठेवा पुढील पिढीसाठी जतन ठेवण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर आजची पिढी मोबाईल युट्युब यांच्या मागे लागले असून त्यांनी खरं आपले वाचन संस्कृती जोपासली तर नक्कीच आपली नवीन सुसंस्कृत पिढी तयार होईल असे अधोरेखित केले. यावेळी त्यांनी तरवडी गावाचा इतिहास देखील सांगितला. या कार्यक्रमात साहित्यिक भाऊसाहेब सावंत, प्रा. डी के मांडलीक, प्रा.डॉ. रवींद्र चव्हाण, प्रा.डॉ संजय दरवडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर महाराष्ट्रभरातून आलेले कवयित्री सौ सुनीताताई वाळुंज, अँड विजयकुमार कस्तुरे, सुनीता कपाळे, कविता आढागळे, डॉ बेंनझीर शेख,

समाजभूषण

सुरेश वैरागर, बाळासाहेब वाहूर वाघ, माकोडे सर यांनी अतिशय उत्कृष्ट अशा कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमांमध्ये समाजामध्ये समाज उपयोगी काम करणारे साहित्यिक, पत्रकार कवी, कवयित्री, डॉक्टर, शिक्षक, खेळाडू यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी योगाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे नाशिक येथील सामाजिक व योग क्षेत्रातील उल्लेखनीय अशा कार्याबद्दल योगदर्शन योग केंद्राचे संचालक विश्वविक्रमवीर योग गुरु बाळासाहेब कमळाबाई धोंडीराम मोकळ यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हरिभाऊ गवळी, बंडू नाईक, सुधीर भारस्कर, अनिल सरोदे, शंकर कन्हेरकर, अनिकेत भारस्कर यांचे सहकार्य लाभले.

समाजभूषण
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

समाजभूषण
समाजभूषण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

समाजभूषण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!