सोनई/ शनिशिंगणापूर– श्री शनेश्वर महाराजांनी शनिशिंगणापूर भूमीत अवतार धारण केल्याने दिवसेंदिवस जगभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असल्याने हे देवस्थान जगाच्या नकाशावर गेले असून जागतिक तीर्थक्षेत्रामध्ये नोंद झाली, असल्याचे मत श्री शेत्र देवगड देवस्थानचे प्रमुख ह भ प गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी व्यक्त केले
ह.भ. प. भास्करगिरी महाराज यांनी शनेश्वर देवस्थान व ग्रामस्थांच्या वतीने शिंगणापूर येथे सुरू असलेल्या महंत उदासी महाराज यांच्या 70 व्या पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रमांस आले असता त्यानिमित्त ते बोलत होते. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने महाराजांचा सन्मान माजी कोषाध्यक्ष पंढरीनाथ शेटे, हभप कारभारी महाराज पंडित व ह भ प आदिनाथ महाराज भोगे यांनी केला महाराज पुढे म्हणाले की, महंत उदासी महाराज व वै.बाबुराव पाटील बानकर यांनी त्याग करून करोडो भाविकांचा आत्मविश्वास संपादित केला, म्हणून छोटे असलेले देवस्थान वटवृक्षाप्रमाणे जागतिक क्षेत्रामध्ये प्रसिद्ध झाले हे देवस्थान आपले समजून गावकऱ्यांनी प्रथा -परंपरा अवगत करून हिंदू संस्कृतीचे रक्षण करावे व वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार व साधुसंताचे विचार हेच सुखी जीवनात समाधान आणू शकते.असे त्यांनी विचार दिले.

संताची संगंत :::::
स्वर्गीय बानकर भाऊ यांनी प्रपंच करून साधुसंतांची व शनि देवाची मनोभावे सेवा केल्याने देवाने त्यांना जवळ घेऊन पायापाशी जागा दिली, हे कलियुगामध्ये जिवंत उदाहरण आहे.
यावेळी रावसाहेब शेटे, पोलीस पाटील ऍड.सयाराम बानकर, माजी सरपंच बाळासाहेब बानकर, बापू तात्या शेटे,माजी अध्यक्ष बाळासाहेब बोरुडे, डॉक्टर रावसाहेब पाटील बानकर, भगवंतराव दरंदले,ह.भ.प. घायाळ महाराज यांच्यासह महिला, पुरुष, वाचक, देवस्थानचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.






