सोनई – कायमस्वरूपी अवर्षग्रस्त असलेल्याशिंगवेतुकाई ता नेवासा येथे जानेवारी पासूनच तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून जनावरांना व माणसांना पिण्यासाठी जवळूनच जाणाऱ्या वांबोरी चारीतून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी गेल्या आठवड्यातशिंगवेतुकाई ग्रामस्थांनीनिवेदनाद्वारे नेवासा तहसीलदारव पाटबंधारे विभाग यांचेकडेनिवेदनाद्वारे केली होतीव 10 मार्च पर्यत पाणी न सोडल्यास गावातच आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.पाणी न सुटल्यानेसोम दि 10 मार्च 2025 रोजीशिंगवेतुकाई ग्रामस्थ यांनी गावातील तुकाई माता मंदिरात आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.

उपोषणास मंडल अधिकारी विनायक गोरे,तलाठी भारत म्हसे यांनी भेट देऊन उपोषण सोडण्याची विनंती केली परंतु गुरू दि 13 मार्च 2025 पर्यत जर वांबोरीचे पाणी सोडण्याचा निर्णय झाला नाही तरमंत्रालयावर अर्धनग्न मोर्चाचा इशारा शिंगवेतुकाई ग्रामस्थ यांनी दिला आहेअहिल्यानगर, पाथर्डी,राहुरी तालुक्यातील गावांना वांबोरी चारीचे पाणी सुरू असतानानेवासा तालुक्यातील शिंगवेतुकाई व इतर गावांवर पाण्याच्या बाबतीत का अन्याय केला जातो असा संतप्त सवाल उपोषणकर्ते व शिंगवेतुकाई ग्रामस्थांनी केला आहेउपोषणास शिवाजी होंडे,पांडुरंग होंडे,रामकृष्ण पवार,उद्धव पवार,ज्ञानदेव पवार,रामदास वाघ,भाऊसाहेब पवार,रघुनाथ पवार,प्रवीण गायकवाड,भाऊसाहेब पवार,पांडुरंग पवार,रेखा पवार,लहान मुले आदी ग्रामस्थ बसले आहेतशिंगवेतुकाईचे सरपंच दीपक पवार,माजी जिल्हा कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, जलसंपदाचे उपविभागीय अभियंता विलास पाटील यांनी उपोषणास भेटी दिल्या.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.