ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
धान्य

अन्न पुरवठा विभागाचा शिधापत्रिकाधारकांना इशारा

नेवासा – मार्च अखेर नेवासा तहसीलमधील ६७.८० टक्के शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी पूर्ण केले आहे. आता ई-केवायसी पूर्ण न झाल्यास संबंधित शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळणार नसल्याचे पुरवठा तपासंणी अधिकारी सुदर्शन दुर्योधन यांनी सांगितले. श्री. दुर्योधन म्हणाले, सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठीही हे पाऊल उचलण्यात आले आहे. नेवासा तालुक्यात स्वस्त धान्याची एकूण १५१ शासकीय दुकाने असून, त्याद्वारे लाभार्थ्यांना धान्यवाटप केले जाते. प्राधान्य कुटुंबातील एकूण लाभार्थ्यांची संख्या एक लाख ९० हजार आहे. तहसीलमध्ये एकूण ७ हजार १६३ ई-केवायसी करणे अनिवार्य आहे.

धान्य

अंत्योदय हे शिधापत्रिकाधारक आहेत. त्यापैकी ७ हजार ५० अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना दरमहा ३५ किलो धान्याचा लाभमिळत आहे. यामध्ये आणखी ११३ अंत्योदय शिधापत्रिकाधारक जोडले जाऊ शकतात. यामध्ये अपंग, दुर्धर आजारी, परित्यक्ता आणि विधवा यांना ३५ किलो धान्य देण्यात येणार आहे. ई-केवायसी न केल्यास रेशनकार्ड बंद होईल.

नेवासा तहसील कार्यालयात ज्या नागरिकांकडे ई-श्रम कार्ड आहे. परंतु रेशनकार्ड नाही, अशा नागरिकांनी ई-श्रम कार्डसह नेवासा तहसीलमधील पुरवठा शाखेशी संपर्क साधावा. त्यांना शिधापत्रिका देण्यात येणार आहेत, असे सुदर्शन दुर्योधन यांनी सांगितले.

धान्य

चौकट-ई-केवायसी न केल्यास रेशन मिळणार नाही. तसेच नाव रेशनकार्डमधूनही काढले जाऊ शकते. यासाठी लाभार्थी ‘मेरा राशन’ या मोबाईल अॅप्लिकेशनच्या मदतीने घरबसल्या केवायसी करू शकतात. ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल २०२५ असल्याचे सुदर्शन यांनी सांगितले.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

धान्य
धान्य
धान्य

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

धान्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!