नेवासा- दिनांक. २१/०४/२०२५ रोजी परि. पोलीस उपअधीक्षक श्री संतोष खाडे, प्रभारी अधिकारी नेवासा पोलीस ठाणे यांना त्यांचे गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, नेवासाफाटा तिरंगा लॉजवर महिलाकरवी कुंटनखाना चालवुन (वेश्याव्यवसाय) करवुन घेत आहेत अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने लागलीच परि. पोलीस उपअधीक्षक श्री. संतोष खाडे यांनी पोलीस स्टाफ यांना तात्काळ त्यांचे कॅबिनमध्ये बोलावुन थोडक्यात बातमीचा आशय समाजावुन सांगुन छापा घालणे बाबत कळवुन पोलीस स्टाफ यांचे पथके तयार करुन त्यांना सरकारी खाजगी वाहनाने रवाना केले असता

नेवासा फाट्यावर असलेल्या तिरंगा लॉजवर 15.25 वाजण्याच्या सुमारास गेलो असता सदर लॉजवर एकुण चार रुम असल्याचे दिसले त्यापैकी आम्ही रुम क्रमांक 101 ची पाहणी केली त्यामध्ये आम्हाला 03 महिला व एक पुरूष ईसम दिसला आमची खात्री झाल्यानंतर आम्ही लागलीच नेवासा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना फोन करुन त्यांना त्यांचे अधिनस्त असलेले शासकीय पंच मिळणेकरीता विनंती केली असता त्यांनी होकार दर्शविला व पंच आलेनंतर सदर पंचासमक्ष लॉजिंग तिरंगामधील रुम क्रमांक 101 ची पाहणी केली असता, रुम मध्ये एकुण 03 महिला दिसुन आल्या त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता, त्यांनी त्यांचे नाव गाव सांगुन महिला क्रमांक 01 व 02 यांना विचारपुस केली असता, त्यांनी सांगितले की, आम्हाला (01) अजय अशोक कोळेकर रा. मक्तापुर ता. नेवासा 02) निलेश एकनाथ शेंडगे रा. नेवासा (03) हनुमान पांढरे मामा यांनी वेश्याव्यवसाय करण्यासाठी बोलावुन घेतले आहे.

तसेच महिला क्रमांक 03 यांना विचारपुस केली असता, त्यांनी सांगितले की, मला सदर रुम मध्ये हजर असलेला ईसम नामे रविंद्र बाळासाहेब मोकाटे, वय 38 वर्षे, रा. मोकाटे मळा सुरज हॉटेल मागे बुरूडगाव अहिल्यानगर याने लॉजिंग मध्ये वेश्याव्यवसायासाठी आणलेले आहे असे सांगितले. त्यानंतर पोलीस स्टाफ व पंचासमक्ष रुमची व 3 महिला यांची महिला पोलीस कर्मचारी यांचेकरुन अंगझडती घेतली असता, रुम मध्ये एकुण वेश्या व्यवसाय साठी लागणारे कंडोम पाकिट व 4 मोबाईल असे एकुण 37,070 /- रुपये किंमतीच्या वस्तु व मोबाईल मिळुन आले आहेत. सदरचा मुद्देमाल संतोष आ. खाडे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक यांनी जागीच पंचासमक्ष पंचनामा करुन मुद्देमाल ताब्यांत घेतला आहे.

तरी वेश्या व्यवसाय करुन घेणारे व वेश्याव्यवसाय चालक आरोपी नामे 01) अजय अशोक कोळेकर रा. मक्तापुर ता. नेवासा 02) निलेश एकनाथ शेंडगे रा. नेवासा 03) हनुमान पांढरे मामा 04) रविंद्र बाळासाहेब मोकाटे, वय 38 वर्षे, रा. मोकाटे मळा सुरज हॉटेल मागे बुरूडगाव अहिल्यानगर यांचेवर नेवासा पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 143 सह स्त्रीया व मुली यांचे अनैतिक व्यापारास (प्रतिबंध) कायदा 1956 चे कलम 3, 4, 5, 7, 8 प्रमाणे मपोकों/ 2116 वर्षा कांबळे नेम – नेवासा पोलीस स्टेशन यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्याची प्रकिया चालु आहे.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक, श्री राकेश ओला सो, अप्पर पोलीस अधीक्षक, वैभव कलुबर्मे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री सुनिल पाटील सो यांचे मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. संतोष खाडे, परि पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक श्री धनजंय अ जाधव, सपोनि अमोल पवार, पोसई मनोज अहिरे, पोसई विकास पाटील, पो हवा शहाजी आंधळे, पो हवा संतोष राठोड, पो कॉ श्रीनाथ गवळी, पोकों वासुदेव डमाळे, पो कॉ अवि वैदय, पो कॉ सुमित करंजकर, पो कॉ नारायण डमाळे, पो कॉ अमोल साळवे, पोकॉ जालींदर दहिफळे, चापोकॉ भवर, मपोकॉ वर्षा कांबळे यांचे पथकाने केली आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.