पाहणीत आढळून आली मोठ्या प्रमाणावर अफरातफर…
सोनई – लोहोगाव ता नेवासा येथील ग्रामपंचायतमध्ये सन 2022 ते 2023 व सन 2023 ते 2025 या कालावधीत मोठ्या प्रमाणावर विविध कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप लोहोगाव ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभा घेऊन विविध पुराव्यनिशी उघड केला होता व त्यानुसार नेवासा गटविकास अधिकारी यांच्याकडे सदर गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली होती.

त्यानुसार गुरू दि 24 एप्रिल 2025 रोजी नेवासा पंचायत समितीच्या विस्तारअधिकारी सुवर्णा लेंडे,शाखा अभियंता गणेश सवई यांच्या पथकाने लोहोगाव ग्रामपंचायतला भेट दिली
विविध बाबीची झालेल्या कामांची सखोल तपासणी केली
यामध्ये गोरगरीब कुटूंबातील चिमुकली मुले शिक्षण घेत असलेल्या लोहोगावमधील विविध अंगणवाड्यामध्ये 15 वित्त आयोगातुन लाखो रुपयांची खेळणी घेतल्याचे व प्रत्यक्षात
असलेल्या खेळण्या यातील तफावत तसेच 15 वित्त आयोगातील
कामे निविदा प्रक्रिया न राबवता कमी दराने आलेल्या निविदा न उघडता नियमबाह्यपणे कामाच्या वर्क ऑर्डर करून निकृष्टपणे केलेल्या कामांची तसेच दलित वस्तीत तरुण शेतकऱ्यांने स्वतः पैसे खर्चून तात्पुरती जाण्यासाठी केलेल्या व्यवस्थेच्या ठिकाणी
पूल केल्याचे दाखवून लाखो रुपये उकळलेल्या जागेची पाहणी करण्यात आली.

तसेच खोटे बिले दाखवून अनेक वेळा विद्युत मोटारींची अस्तिवात नसलेल्या दुकानातुन केलेली खरेदी यासह इतर तक्रारींची चौकशी समितीने ग्रामस्थ पंचासह पाहणी केली तसेच ग्रामस्थांचे लेखी म्हणणे घेण्यात आले व सदर गैरव्यवहाराचा अहवाल तातडीने सादर करून असे सांगितले. याप्रसंगी
सामाजिक कार्यकर्ते सुरेश कल्हापुरे,सनी शिरसाठ यांनी विविध प्रकारे झालेल्या गैरव्यव्हाराची माहिती चौकशी समितीस पुरव्यानिशी दाखवून दिली.

आरोप असलेले तत्कालीन सरपंच व विद्यमान सरपंच यांनी चौकशी समितीला सामोरे जाणे टाळले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुरेश कल्हापुरे,चेअरमन जालिंदर ढेरे,उपसरपंच निसार सय्यद, माजी सरपंच व विद्यमान सदस्य सौ मीराबाई घाटोळे,दत्तात्रय तनपुरे,मा सरपंच भास्कर जाधव,सनी शिरसाठ, संतोष जाधव,म्हतारदेव ढेरे,संतोष पाटोळे,सीताराम रावडे,विकास राजळे, विकास ढेरे, सुजित ढेरे,प्रमोद घुले,
शुभम खाडे, सौरभ शिरसाठ,गणेश तनपुरे
आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटोओळी…
लोहोगाव ता नेवासा येथील पूल न बांधता बिल काढलेल्या जागेची पाहणी करतांना चौकशी समिती व ग्रामस्थ.
विविधी बाबींची तपासणी पंच ग्रामस्थासह करण्यात आलेली आहे.तातडीने चौकशी समितीचा अहवाल सादर करू.
– सुवर्णा लेंडे , विस्तारअधिकारी

ग्रामपंचायतमध्ये झालेल्या लाखो रुपयांचा भ्रष्टाचार चौकशी समितीच्या पुरव्यासह निदर्शनास आणून दिली आहे. लहान मुलांच्या अंगणवाडीच्या खेळण्यातही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्या असल्याचे दिसत आहे यामुळे मनाला मोठ्या वेदना झाल्या आहेत दोषींवर कडक करावाई करण्यात यावी
– सुरेश कल्हापुरे, सामाजीक कार्यकर्ते लोहोगाव..

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.