ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
दारु

नेवासा-दिनांक २०.०५.२०२५ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास परिवक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. संतोष खाडे यांना नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमधील नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकामधील कुकाणाकडे जाणारे रस्त्यावर वाहन तपासणी करत असताना एक सफेद रंगाची सिआझ वाहन क्रमांक MH ०१ CD ०४१६ यामधुन कुकाणाकडे जात असताना तीस थांबण्याचा ईशारा करुन थांबविले असता व नमुद वाहनाची तपासणी केली असता, सदर वाहनामध्ये देशी भिंगरी संत्रा कंपनीचे दोन बॉक्स ज्यामध्ये एकुण २०० बॉटलसह वाहन चालक व सोबतच्या ईसमांचे नाव ०१) रोहीदास भगवान गुंजाळ, वय ३३ वर्षे, ०२) अभिषेक दुर्गाअण्णा गुंजाळ, वय २२ वर्षे, दोघे रा.चिलेखनवाडी ता. नेवासा जि. अहिल्यानगर हे मिळुन आले असुन सदर वाहनामध्ये मिळुन आलेल्या दारुचे बाटल्यांचे वर्णन खालीलप्रमाणे..

दारु

०३) ५,००,०००/- रुपये किंमतीची सिआझ वाहन क्रमांक MH ०१ CD ०४१६ अशा वर्णनाची गाडी.

०४) ७०००/- रुपये किंमतीचे दोन बॉक्स ज्यामध्ये देशी भिंगरी संत्रा कंपनीच्या २०० दारुच्या बाटल्या प्रति बॉटल ३५/- रुपये

प्रमाणे..

एकुण ५,०७०००/-

असा वरीलप्रमाणे मुद्देमाल मिळुन आलेला असुन सदरचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्ती पंचनामा करुन पुढील कार्यवाही करीता ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन नेवासा येथे ठेवण्यात आलेला असुन पुढील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.

दारु

तरी यापुढे पोलीस स्टेशन नेवासा हद्दीमध्ये अशाच प्रकारे अवैध धंदे चालकांवर छापेमारी करुन कारवाईचा बडगा उगरण्यात आलेला असुन ज्या व्यक्तींवर सदर कायद्यांतर्गत एकापेक्षा जास्त गुन्हे दाखल असतील त्यांच्याविरुध्द जास्तीत जास्त रक्कमेचा बॉन्ड घेवुन प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे तसेच यापुढेही सदर ईसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई करुनही फरक न पडल्यास हद्दपार सारखी कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच यापुढेही अशाच प्रकारे अवैध धंदे चालकांवर कारवाई चालु राहणार आहे ठणकावून सांगितले.

सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला सो पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा.श्रीम. वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर व उप विभागीय पो. अधिकारी श्री. सुनिल पाटील सो उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उपविभाग यांचे सुचना मागदर्शनाखाली नेवासा पोलीस स्टेशनचे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष आ. खाडे यांनी व त्यांचे पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी कलेली आहे.

दारु
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

दारु
दारु

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

दारु

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *