नेवासा-आज दिनांक. २७/०५/२०२५ रोजी सकाळी ०६/०० वा.चे. सुमारास पोलीस ठाणे नेवासा प्रभारी अधिकारी श्री. संतोष खाडे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक यांना गोपणीय माहिती मिळाली की, मौजे टाकळीभान ता श्रीरामपुर जि. अहिल्यानगर येथील इसम नामे बाबा सावंत हा नेवासा गावात तयार देशी हातभट्टी गावठी दारु विक्री करण्यासाठी येणार आहे असे माहिती मिळाल्याने लागलीच प्रभारी अधिकारी यांनी पोलीस स्टाफ यांना थोडक्यात बातमीचा आशय सांगुन छापा टाकणे बाबत तोंडी आदेश दिल्याने पोलीस स्टाफ व पंच असे मौजे नेवासा खुर्द ता नेवासा येथे सकाळी ०६/१५ वा.चे सुमारास छापा कारवाई करणे कामी थांबले असता एक इसम श्रीरामपुर रोडने नेवासाकडे संशयीतरित्या मोटार सायकल व त्यावर चार काळे रंगाचे ड्रम घेवुन रोडवर जात असताना दिसला

त्यास पोलीस स्टाफ यांनी थांबवुन त्यास पंचासमक्ष त्याचे नाव, गाव विचारले असता त्याने त्यांचे नाव बाबासाहेब गिताराम सावंत वय ३१ वर्षे रा. टाकळीभान. ता. श्रीरामपुर. जि. अहिल्यानगर असे सांगुन पोसई विकास पाटील व पोलीस स्टाफ यांनी पंचासमक्ष मोटार सायकल वरील चार ड्रमची पाहणी केली असता सदर ड्रम मध्ये गावठी हातभटटी दारु विक्री करण्याचे उददेशाने मिळुन आल्याने १४० लीटर तयार गावठी हातभटटी किंमत रुपये १४,००० /-रुपये तसेच ५०,००० /- किंमतीची एक लाल रंगाची हिरो कंपनीची ड्युक मॉडेलची विना नंबरची मो. सायकल असा एकुण ६४,००० /- रुपये किंमतीचा मुददेमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला असुन इसम नामे बाबासाहेब गिताराम सावंत वय ३१ वर्षे रा. टाकळीभान. ता. श्रीरामपुर.जि.अहिल्यानगर यांचे विरुध्द पोलीस ठाणे नेवासा गुन्हा रजि नं. ५३६/२०२५ महाराष्ट्र दारुबंदी का. कलम ६५ (ई) (अ) प्रमाणे

गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हांचा पुढील अधिकचा तपास पो. हवा. अजय साठे हे करित आहेत. सदरची कामगिरी श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्री. वैभव कुलबुर्गे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर विभाग, श्री. सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगांव विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे नेवासा प्रभारी अधिकारी श्री. संतोष खाडे, परि.पोलीस.उप.अधीक्षक, पोसई विकास पाटील, पो.हवा.अजय साठे, पोकॉ आप्पासाहेब तांबे, नारायण डमाळे, भारत बोडखे, गणेश जाधव यांचे पथकाने केली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.