गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील सोनई येथे दि. २९ रोजी संध्याकाळी ८ वाजता फिर्यादी सागर म्हसु कुसळकर (वय.३१) हे आपल्या राहत्या घरासमोर असताना त्या ठिकाणी आरोपी शेंग्या उर्फ सौरभ राजभिव, सनी ऊर्फ मदन किसन शिंदे,सर्व राहणार सोनई, विशाल ज्ञानदेव ब्राम्हणे, रा. शिंगणापूर फाटा व इतर तिन अनोळखी इसम यांनी लोखंडी रा ॅड तलवार, कत्ती व लाकडी दांडा तसेच लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केले. शिवीगाळ केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे दि. ३१ रोजी दाखल असलेल्या फिर्यादी मध्ये म्हटले आहे.

त्यानुसार गुन्हा र. नं. २११/२०२५ बिएनएस चे कलम ११८(२), १९१(२), १९१(३), ११५(२), ३५१(२) (३), ३५२ आर्म अॅक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पुर्वी यातील आरोपी शेंग्या उर्फ सौरभ राजभिव यावर दोन ते तीन गुन्ह्यात तो पोलीसांना हवा आहे.तो त्यामध्ये फरार आहे . पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब बाचकर हे करत आहेत


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.