ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
पोलीस

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील पांढरी पुल ते घोडेगाव मध्ये सध्या गुन्हेगारी च्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अहील्यानगर ते संभाजी नगर या महामार्गावर असणारे ही दोन्ही गावे. त्यात पांढरी पुल येथील इमामपुर चा लुटारुंसाठी असलेली वाढती संख्या तसेच या महामार्गावर रात्रभर चालणारी हाॅटेल व्यवसाय देखील तितकाच या गोष्टीला जबाबदार आहे. या ठिकाणी हर एक प्रकारचे अवैध धंदे सुरू असतात. गुन्हे शाखेचे अधिकारी व पोलीस प्रशासन यांना सर्वाधिक या गोष्टींची माहिती असुन सुद्धा या कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते आहे.

पोलीस

दोन दिवसांपूर्वी च शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे हद्दीत पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एकास गाडी थांबवुन चाकु चा धाक दाखवत लुटले, घोडेगाव मध्ये तर गावठी कट्यांचे माहेरघर म्हटले तर काही वावगे ठरणार नाही. या कांदा व्यापारी, तसेच जनावरांच्या खरेदी विक्री साठी परराज्यातील येणारे व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर येत असतात हे या लुटारुंना ज्ञात असते नेमके हिच संधी साधत ते आपला डाव साधत असतात. या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी सुरू असलेली हाॅटेल यांना एक ठराविक वेळ ठरवुन देणे बंधनकारक आहे. परंतु ते होणे शक्य दिसत नाही. कारण या सर्वांचे स्थानिक गुन्हे अन्वेषण चे अधिकारी व पोलीस यांचे लागेबांधे असल्याने शक्य होईल असे वाटत नाही. तरी या मध्ये वरिष्ठांनी लक्ष घालण्याची गरज आहे त्याचप्रमाणे अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना अंकुश लावणे गरजेचे आहे.

पोलीस
पोलीस

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पोलीस
पोलीस
पोलीस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पोलीस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *