फौजदारी गुन्हे दाखल करा: डॉ. करणसिंह घुले
नेवासा – जेऊर हैबती (ता. नेवासा) येथे कामगार विभागातर्फे झालेल्या चौकशीनंतर आढळून आलेल्या बोगस कामगार व त्यांना नोंदीत करणाऱ्या एजंटच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे तसेच ग्रामपंचायत कार्यालयाचे बनावट शिक्के वापरुन कामगार मंडळाकडे नोंदीत झालेले सुमारे ३ हजार ५०३ कामगारांपैकी ३ हजार १६४ बनावट कामगार शोधून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावा. त्यांनी घेतलेला लाभ पुन्हा मंडळाने परत करुन घेण्याचा सज्जड इशारा अहिल्यानगर मजदूर संघाने दिला आहे.

दरम्यान, नेवासा तालुक्यात होणारी बोगस कामगारांची नोंदणी ही केवळ ठेकेदार, इंजिनियर आणि ग्रामपंचायतीचे बनावट शिक्के वापरुन केली जात असून ही नोंदणी थांबविण्याकरीता तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी करत बनावट काम करणाऱ्या संबंधित एजंटना शोधून त्यांच्यावर आणि नोंदीत झालेल्या बनावट कामगारांवर तातडीने फौजदारी कारवाई करण्याच्या मागणीसाठी सोमवार (दि.३०) रोजी अहिल्यानगर येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर समर्पण मजदूर संघ ढोल बजाओ आंदोलन करुन न्याय मागणार असल्याची माहिती डॉ. करणसिंह घुले यांनी दिली.
नेवासा तालुक्यात बांधकाम कामगार लाभ वाटपामध्ये फार मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून येत असल्याचे दिसून येत आहे. शिष्यवृत्तीच्या लाभासाठी जानेवारीपासून समर्पण मजदूर संघाचे खरे बांधकाम कामगार अद्यापही लाभापासून वंचित आहेत. शिष्यवृत्ती वाटपाची प्रक्रिया पारदर्शक करावी,

शिष्यवृत्ती वाटपाचा पूर्ण आढावा जागेवर बैठक घेऊन देण्यात यावा, मागील प्रलंबित शिष्यवृत्ती तातडीने कामगारांच्या खात्यात वर्ग करावी या व अन्य मागणीसाठी सोमवार (दि.३०) रोजी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर समर्पण मजदूर संघ ढोल बजाओ आंदोलन करणार आहे. नवीन नोंदणी झालेल्या अनेक कामगारांचे स्मार्ट कार्ड मंडळाने हस्तांतरित केलेले नाही, ही बाब बेकायदेशीर आहे. नवीन नोंदणी झालेल्या कामगारांना भांडीवाटप, सुरक्षा संच वाटप तातडीने करावे. कामगार कार्यालयाकडून आपली कार्यपद्धती तातडीने सुधारुन घेण्याचा इशाराही निवेदनात दिला आहे.
मयत कामगारांचा विमा व इतर लाभ हे मयत कामगाराच्या मृत्यूनंतर महिन्याच्या आत त्यांच्या कुटुंबियांना तातडीने देण्यात यावा, तसेच तीन वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत असलेले कर्मचाऱ्यांची इतर ठिकाणी बदली करुन नवीन कामगारांची भरती करण्याची मागणी संघाने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडे करुन आज ढोल बजाओ आंदोलन करणार असल्याची माहिती डॉ. घुले यांनी दिली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.